मुंबई : मैदानावर धम्माल उडवून देणाऱ्या रवींद्र जडेजाच्या शानदार प्रदर्शनासहीत भारतीय क्रिकेट टीमनं दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये श्रीलंकेला एका इनिंग आणि ५३ रन्सनं पछाडलं. यासोबतच भारतानं तीन मॅचच्या सीरीजमध्ये वर्चस्व मिळवलंय.
या मॅचमध्ये पुष्पकुमारा सध्या सोशल मीडियावर हास्याचा विषय ठरलाय. पुष्पकुमारानं एक छोटी चूक केली... आणि तीच त्याला आणि टीमला चांगलीच महागात पडली.
पुष्पकुमारा वेगळ्या पद्धतीनं शॉट खेळायला गेला आणि आपली विकेट गमावून बसला. आर. अश्विनच्या बॉलवर पुष्पकुमारा रिव्हर्स स्वीप मारायला गेला... आणि आऊट झाला. यामुळेच, श्रीलंकन फॅन्ससोबतच माजी क्रिकेटर सुनील गावसकर यांनीही त्याच्यावर सडकून टीका केली.
— Cricvids (@Cricvids1) August 6, 2017
पुष्पकुमाराला अशा पद्धतीनं आऊट झालेलं पाहून सोशल मीडियावर त्याच्यावर टीका झाली नाही तरच नवल.... ग्लेन मॅक्सवेल बनायच्या भानगडीत पुष्पकुमार आऊट झाला असंही शांतनु नावाच्या एका युझरनं म्हटलंय.
Pushpakumara played his role pretty well. But in the end he seemed to forget his role & tried to pull off Glenn Maxwell! #SLvIND
— Shantanu Smart (@smartshantanu) August 6, 2017
Pushpakumara just played the most wonderful shot in test cricket to get out.
— Amitesh Singh (@amiteshSingh_3) August 6, 2017
What was Pushpakumara thinking with that reverse sweep attempt?#INDvSL
— AVINASH JAISWAL (@ajcruiser7) August 6, 2017
भारत आणि श्रीलंके दरम्यान तिसरी टेस्ट मॅच पाल्लेकेलेमध्ये १२ ऑगस्ट रोजी खेळली जाईल. यानंतर दोन्ही टीममध्ये पाच वन डे आणि एक टी-२० मॅच खेळली जाईल.