मुंबई : आयपीएल २०२० सुरु आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि धोनी यांचे आयपीएलमध्ये अनेक रेकॉर्ड आहेत. आयपीएल २०२० मध्ये केएल राहुलनेही शतकीय खेळी केली आहे. त्यासोबतच मयंक अग्रवालने देखील शतक ठोकले आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये शतक ठोकणारे काही खेळाडूच अनेकांना आठवतात. पण काही खेळाडू असेही आहेत ज्यांची माहिती खूप कमी लोकांना असेल.
1. शॉन मार्श
शॉन मार्शने आयपीएलच्या इतिहासात शतक ठोकले होते. पण याची आठवण खूप कमी लोकांना असेल. शॉन मार्श आयपीएलच्या पहिल्या सत्रात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना शतक ठोकलं होतं. त्याने राजस्थानविरुद्ध त्याने मोहालीमध्ये 69 बॉलमध्ये 115 रन केले होते. मार्शने या दरम्यान 11 फोर आणि 7 सिक्स ठोकले होते. त्याच्या खेळीमुळे पंजाबने 41 धावांनी विजय मिळवला होता.
2. हाशिम अमला
दक्षिण अफ्रिकेचा दिग्गज फलंदाज हाशिम अमलानेही आयपीएलमध्ये शतक झळकावले आहे हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. अमलाने 2017 च्या मोसमात मुंबई इंडियन्स विरूद्ध 104 धावांची शानदार खेळी केली होती. त्या मोसमात हाशिम अमला किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळत होता. मुंबई इंडियन्स (एमआय) विरुद्धच्या सामन्यात अमलाने 60 बॉलमध्ये 104 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये 6 सिक्स तर 8 फोरचा समावेश होता.
3. पॉल वाल्थटी
आयपीएलच्या इतिहासात बँडल मॅक्युलम शतक झळकावणारा पहिला फलंदाज होता, पण त्याच वेळी पॉल वाल्थटीने 2011 मध्ये शतक ठोकले होते. 2011 मध्ये पॉल वाल्थटी किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला होता. त्याने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 120 धावांची शानदार खेळी केली होते. वाल्थटीने फक्त 63 बॉलमध्ये 120 धावा केल्या. ज्यामध्ये 19 फोर तर 2 सिक्सचा समावेश होता. वाल्थटीच्या शतकीय खेळीमुळे पंजाबने सीएसकेला पराभूत केले. पण हा खेळाडू आता आयपीएलच्या इतिहासात कुठेतरी हरवला आहे. आयपीएलच्या इतिहासात शतक ठोकणारा पॉल वाल्थटी हा 13 वा खेळाडू होता.