मुंबई : 26 मार्चपासून आयपीलएलच्या 15 व्या सिझनला सुरुवात होणार आहे. यंदाच्या सिझनमध्ये दोन नवी टीम्स ही स्पर्धा खेळणार आहेत. दरम्यान भारताचा धडाकेबाज खेळाडू केएल राहुल पंजाबनंतर आता लखनऊ सुपर जाएंट्समध्ये खेळताना दिसणार आहे. अशातच पंजाब किंग्जच्या कर्णधार पदाची धुरा कोण सांभाळणार असा प्रश्न समोर होता. अखेर या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय.
आईपीएल टीम पंजाब किंग्सने मयांक अग्रवाल याच्याकडे कर्णधार पदाची धुरा दिली आहे. त्यामुळे 2022 मध्ये पंजाब किंग्स मयांक अग्रवालच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. अग्रवाल आतापर्यंत कधीही आयपीएलच्या कोणत्याही टीमचं कर्णधारपद भूषवलं नव्हतं.
मेगा ऑक्शनूपूर्वी पंजाबने दोन खेळाडूंना रिटेन केलं होतं. यामधील एक खेळाडू मयांक अग्रवाल होता. फ्रेंचायजी त्याला जाण्यापासून रोखण्यात यशस्वी झाली होती. याशिवाय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग या रिटेन केलं होतं. यावेळी मयंक कर्णधार होणार अशी अटकळ बांधली जात होती.
लिलावादरम्यान या टीमकडे सर्वात जास्त पैसे होते. सध्या या टीममध्ये शिखर धवन, कगिसो रबाडा, लियम लिविगस्टोन आणि जानी बेयरस्टो हे खेळाडू आहेत.
पंजाब किंग्जने त्यांच्या सोशल मीजियावरून आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. कर्णधार बनल्यानंतर मयांक अग्रवाल म्हणाला, आयपीएल 2022मध्ये पंजाब किंग्जचं कर्णधारपद मिळाल्याने मी फार खूश आहे. यावेळी आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाणार आहे. पंजाबने आतापर्यंत एकंही आयपीएल जिंकलेली नाही.