WPL 2023 Final: पहिल्या हंगामाची क्विन 'Mumbai Indians'; दिल्लीचा पराभव करत रचला इतिहास!

पहिल्या महिला प्रीमीयर लीगच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा विजय झाला आहे. मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा 7 विकेट्सने पराभव केला आहे.

Updated: Mar 26, 2023, 11:22 PM IST
WPL 2023 Final: पहिल्या हंगामाची क्विन 'Mumbai Indians'; दिल्लीचा पराभव करत रचला इतिहास!

MI vs DC WPL Final : पहिल्या महिला प्रीमीयर लीगच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा विजय झाला आहे. मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा 7 विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासह मुंबईने पहिलीच प्रीमीयर लीग आपल्या नावे केली आहे. नॅट सिव्हर ब्रंट मुंबईच्या विजयाची खरी शिल्पकार ठरली आहे. 

ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात (WPL फायनल) मुंबई संघाने दिल्ली कॅपिटल्सचा 7 गडी राखून पराभव केला आणि उद्घाटन हंगामाचा चॅम्पियन बनला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 षटकांत 9 गडी गमावून 131 धावा केल्या. यानंतर मुंबईने 19.3 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठले.

मुंबईची टीम झाली चॅम्पियन

ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सिझनमध्ये अंतिम सामन्यात दिल्लीच्या मुंबईला 132 चं टारगेट दिलं होतं. यानंतर नॅट ब्रंटच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने ३ बॉल्स राखून विजय मिळवून दिला. नॅटने 55 बॉल्समध्ये 7 फोर्सच्या मदतीने 60 रन्स केले. याशिवाय कर्णधार हरमनप्रीत कौरने 39 बॉल्समध्ये 5 फोरच्या मदतीने 37 रन्स केले.

दिल्लीच्या फलंदाजांची खराब कामगिरी

फायनलच्या सामन्यात एकाही खेळाडूला चांगली खेळी करता आली नाही. फलंदाजी करतान दुसऱ्याच ओव्हरमध्ये शेफाली वर्माच्या रूपाने दिल्लीने पहिली विकेट गमावली. तर त्याच ओव्हरमध्ये एलिस कॅप्सी देखील पव्हेलियनमध्ये परतली. दिल्लीने एकीकडे 79 रन्समध्ये 9 विकेट गमावल्या होत्या. मात्र त्यानंतर शिखा पांडे आणि राधा यादव यांनी शेवटच्या विकेटसाठी नाबाद 52 रन्सची पार्टनरशिप केली. या दोघींनी तुफान खेळी करत 131 स्कोर केली.

वोंगने एकाच ओव्हरमध्ये घेतले 2 विकेट्स

दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात फारच खराब झाली. अवघ्या 12 रन्समध्ये त्यांनी 2 विकेट गमावल्या होत्या. गेल्या सामन्यात हॅट्रिक घेणाऱ्या इस्सी वोंगने दिल्लीला सुरुवातीलाच 2 धक्के दिले. यामध्ये तिच्या ओव्हरमध्ये तिसऱ्या बॉलवर शेफाली वर्मा आणि पाचव्या बॉलवर अॅलिस कॅप्सी यांनी विकेट गमावली.