World Cup 2023 Schedule: ठरलं तर! 'या' तारखेपासून होणार वर्ल्ड कप 2023 ला सुरुवात; ICC ने जाहीर केलं सामन्यांचं शेड्यूल

क्रिकेट प्रेमींसाठी हे वर्ष खूप खास आहे. याचं कारण म्हणजे यावर्षी वनडे वर्ल्डकपचं आयोजन करण्यात येणार आहे. भारतामध्ये यंदाचा वर्ल्डकप खेळवला जाणार असून यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. 

Updated: Mar 26, 2023, 08:01 PM IST
World Cup 2023 Schedule: ठरलं तर! 'या' तारखेपासून होणार वर्ल्ड कप 2023 ला सुरुवात; ICC ने जाहीर केलं सामन्यांचं शेड्यूल title=

World Cup 2023 Schedule: क्रिकेट प्रेमींसाठी हे वर्ष खूप खास आहे. याचं कारण म्हणजे यावर्षी वनडे वर्ल्डकपचं आयोजन करण्यात येणार आहे. भारतामध्ये यंदाचा वर्ल्डकप खेळवला जाणार असून यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. चाहत्यांना ज्याची प्रतिक्षा होती, त्याबाबत अखेर आयसीसीने मोठा खुलासा केला आहे. ICC वर्ल्डकपसंदर्भातील सामन्यांचं शेड्यूल जाहीर केलं आहे.

वर्ल्डकपच्या प्रमुख सामन्यांअगोदर क्वालिफाय सामने खेळवण्यात येणार आहेत. याचं शेड्युल आयसीसीने जाहीर केलं आहे. चला जाणून घेऊया कधीपासून सुरु होणार आहेत.

क्वालिफायर सामन्यांचं शेड्युल कसं असेल?

यंदाच्या वनडे वर्ल्डकपचं आयोजन होणार आहे. एका रिपोर्टनुसार, 5 ऑक्टोबरपासून या टूर्नामेंटचा पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. तर त्यापूर्वी 26 मार्चपासून वर्ल्ड कप क्वालिफायर प्ले-ऑफ सामने सुरूवात झाली आहे. नामिबिया या प्ले ऑफ क्वालिफायरचं आयोजन करणार आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 वनडे वर्ल्डकपच्या क्वालिफायरचे सामने 26 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान होणार आहे. यावेळी नामिबियाचा सामना अमेरिकेशी होणार आहे. एकूण सहा ICC पुरुष क्रिकेट वर्ल्डकप पात्रता प्लेऑफमध्ये खेळणार आहेत. 

कसं असेल Qualifiers schedule?

  • 26 मार्च : नामीबिया विरूद्ध यूएसए
  • 27 मार्च : यूएई विरूद्ध पीएनजी
  • 29 मार्च : कनाडा विरूद्ध यूएसए
  • 30 मार्च : नामीबिया विरूद्ध जर्सी
  • 1 एप्रिल : यूएई विरूद्ध कनाडा
  • 2 एप्रिल: पीएनजी विरूद्ध यूएसए
  • 4 एप्रिल : कॅनडा विरूद्ध नामीबिया
  • 5 एप्रिल : जर्सी विरूद्ध यूएई

वर्ल्डकपची तारीख समोर

वनडे वर्ल्डकप 2023 चं यजमानपद यंदा भारताकडे आहे. क्रिकेटची ही सर्वात मोठी स्पर्धा यंदा भारतात होणार आहे. एका रिपोर्ट्सप्रमाणे, भारतात होणारा वनडे वर्ल्डकप येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेचा फायनल सामना 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

कोणत्या शहरांमध्ये होणार सामने?

वनडे वर्ल्डकपमध्ये 3 नॉकआऊट सामन्यांसोबत एकूण 48 सामने खेळवले जातील. यामध्ये भारताच्या एकूण 12 शहरांमध्ये सर्व सामने खेळवले जाणार असल्याची माहिती आहे. यामध्ये मुंबई, कोलकाता, लखनऊ, इंदूर, दिल्ली, लखनऊ, चेन्नई, बंगळूरू, धर्मशाला, गुवाहाटी, राजकोट आणि  हैदराबाद या शहरांचा समावेश आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x