भारतीय क्रिकेट जगतावर 'राज' करणाऱ्या मितालीचं मोठं पाऊल; निवृत्ती घेत क्रीडाप्रेमींना धक्का

मितालीने बुधवारी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याची घोषणा केली आहे.

Updated: Jun 8, 2022, 02:48 PM IST
भारतीय क्रिकेट जगतावर 'राज' करणाऱ्या मितालीचं मोठं पाऊल; निवृत्ती घेत क्रीडाप्रेमींना धक्का title=

मुंबई : भारतीय महिला टीमची कर्णधार मिताली राजने चाहत्यांना एक मोठा धक्का दिला आहे. मितालीने बुधवारी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याची घोषणा केली. तिच्या या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. तिने टीम इंडियासाठी तिन्ही फॉर्मेटचं कर्णधारपद भूषवलं होतं.

मिताली राजने वयाच्या 39 व्या वर्षी निवृत्तीची घोषणा केली. तिने यासंदर्भात ट्विट करत निवृत्तीची माहिती दिली. ती म्हणते, मी एक लहान मुलगी होते जेव्हा मी ब्लू जर्सी घालून देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं. हा प्रवास दीर्घकाळ चालला. ज्यामध्ये दोन गोष्टी पहायला मिळाल्या. 

मिताली पुढे म्हणते, "गेली 23 वर्षे माझ्या जीवनातील सर्वोत्तम काळ ठरला. सगळ्या प्रवासांप्रमाणे आता हा प्रवासही संपणार आहे. आज मी इंटरनॅशनल क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा करतेय."