Moeen Ali Test Retirement: 'कॅप्टनने मॅसेज केला तरी...', मोईन अलीचा टेस्ट क्रिकेटला अलविदा!

Moeen Ali announces Test retirement: अॅशेस मालिकेनंतर इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर मोईन अली (Moeen Ali ) याने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आहे.  

Updated: Aug 1, 2023, 10:54 AM IST
Moeen Ali Test Retirement: 'कॅप्टनने मॅसेज केला तरी...', मोईन अलीचा टेस्ट क्रिकेटला अलविदा! title=
Moeen Ali, Test retirement

Moeen Ali On Test Retirement: नुकत्याच झालेल्या अॅशेस मालिकेच्या पाचव्या दिवसअखेर इंग्लंडला दोन मोठे धक्के बसले आहेत. स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याने ऍशेस 2023 कसोटी मालिकेच्या पाचव्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी निवृत्तीची घोषणा (Moeen Ali announces Test retirement) केली होती. त्यानंतर आता इंग्लंडचा स्टार ऑलराऊंडर मोईन अली याने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आहे. इंग्लंडने अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला धुळ चारली. अशातच शेवटच्या कसोटीनंतर इंग्लंडच्या दोन खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केली.

मोईन अलीने 2021 मध्ये कसोटी फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती, परंतु अ‍ॅशेस 2023 सुरू होण्याआधी त्याला कर्णधार बेन स्टोक्सने निवृत्ती मागे घेण्यासाठी एक मेसेज केला होता. त्याच्या विनंतीला मान देऊन मोईन अली अॅशेस खेळ्यासाठी तयार झाला होता. अशातच आता त्याने पुन्हा निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यावेळी त्याने आता पुन्हा येणार नाही, असं म्हणत कॅप्टनला स्पष्ट संकेत दिले आहेत.

काय म्हणाला Moeen Ali ?

जर कॅप्टन स्टोक्सने त्याला पुन्हा टेस्ट क्रिकेट खेळण्यासाठी मेसेज केला तर तो मेसेज डिलीट करेल. जॅक लीच अॅशेसपूर्वी दुखापतग्रस्त झाला होता. यानंतर स्टोक्सने मोईन अलीला मेसेज करून खेळण्यासाठी बोललं होतं. माझ्यासाठी कमबॅक करणं मानसिकदृष्ट्या सोपं नव्हतं. परंतु त्याहूनही अधिक ते माझ्यासाठी शारीरिकदृष्ट्या कठीण होतं, असं मोईन अली म्हणाला आहे. मी याआधीही नंबर 3 वर फलंदाजी केली आहे. त्यामुळे ते माझ्यासाठी पुरेसं होतं. माझं काम पूर्ण झाले आहे, असं म्हणत मोईन अलीने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकलाय.

पाहा Video

निर्णायक असा पाचवा कसोटी सामन्यात इंग्लंडने 49 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्याचबरोबर आता अॅशेस सिरीज 2-2 अशी ड्रॉ झाली आहे. त्यामुळे आता अॅशेसची ट्रॉफी ऑस्ट्रेलियाकडे राहणार आहे. पाचवा सामना जिंकून आता इंग्लंडने ऑस्ट्रेलियाच्या स्वप्नांची राख केली आहे.

स्टुअर्ट ब्रॉडची निवृत्ती

दरम्यान, 29 जुलै रोजी स्टुअर्ड ब्रॉडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया ( England vs Australia ) यांच्यातील पाचवी टेस्ट त्याच्या कारकिर्दीतील शेवटची मॅच ठरली. त्याचवेळी स्टुअर्ट ब्रॉड ( Stuart Broad ) रविवारी मैदानावर फलंदाजीसाठी उतरताना भावूक झालेला दिसून आला.