दुबई : टीम इंडियातून सध्या बाहेर असलेले भारताचे २ धडाकेबाज क्रिकेटर युवराज सिंह आणि सुरेश रैना यांच्यासाठी माजी भारतीय कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन यांनी आवाज उठवला आहे.
युवराज आणि या दोन्ही खेळाडूंना फिटनेसच्या बाबतीत थोडी सूट द्यायला हवी. असं म्हटलं आहे. युवराज आणि रैना या दोघांचं समर्थन करत अजहरुद्दीन यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांचा समावेश व्हावा असं म्हटलं आहे.
भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी खेळाडूंना फिटनेसच्या बाबतीत 19 गुण मिळवावे लागतात. माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी, कर्णधार विराट कोहली आणि मनीष पांडे यासारखे खेळाडू सहज 20-21 पॉइंटपर्यंत पोहचतात पण युवराज, रैना यामध्ये फेल झाले आहेत. यामुळे त्यांचं सिलेक्शन नाही झालं.
दुबईमध्ये एका कार्यक्रमात बोलतांना अजहरने म्हटलं की, फिटनेसबाबत प्रत्येक खेळाडूला फिट असलं पाहिजे. पण काही असे खेळाडू आहे जे करिअरच्या शेवटच्या टप्प्यात आहेत पण ते आजही चांगली कामगिरी करत आहे. अशा खेळाडूंना थोडी सूट दिली पाहिजे.
माजी क्रिकेटर सुनील गावस्करांच्या मते दोन खेळाडूंचे पुनरागमन होणे गरजेचे आहे. गावस्करांनी काही जुन्या खेळाडूंना पुन्हा संधी दिली जावी असा सल्ला निवड समितीला दिला आहे. चौथ्या क्रमांकावर खेळण्याची जी समस्या आहे ती जुन्या खेळाडूंना संधी देऊन दूर होऊ शकते.
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातील विजयानंतर गावस्कर म्हणाले, भारतीय संघाच्या अडखळत्या मध्यमक्रमाला सांभाळण्यासाठी संघात सुरेश रैना आणि युवराज सिंह यांचे पुनरागमन होणे गरजेचे आहे. हे दोन्ही क्रिकेटर मध्यम फळीतील फलंदाजी सांभाळण्यासोबतच गोंलादाजीतही चांगले योगदान देऊ शकतात.