'बाळा तुला लवकरच भेटेन', मुलीच्या बर्थडेला शमीचं भावनिक ट्विट

टीम इंडियाचा वेगवान बॉलर मोहम्मद शमीने भावनिक ट्विट केलं आहे. 

Updated: Jul 18, 2019, 08:27 PM IST
'बाळा तुला लवकरच भेटेन', मुलीच्या बर्थडेला शमीचं भावनिक ट्विट

मुंबई : टीम इंडियाचा वेगवान बॉलर मोहम्मद शमीने भावनिक ट्विट केलं आहे. शमीने हे ट्विट त्याच्या मुलीच्या चौथ्या वाढदिवसानिमित्ताने केले आहे. शमीने आपल्या मुलीला शुभेच्छा देताना म्हटलं की, 'वाढदिवसासारखा दिवस तुझ्या आयुष्यात नेहमी येवो. मला तुझी आठवण येत आहे. मी नेहमीच तुझ्या सोबत आहे. मी लवकरच तुला भेटायला येतोय'.

शमीची पत्नी हसीन आणि त्यांची ४ वर्षांची मुलगी हे दोघे शमीच्या घरात राहत नाही. शमी नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मुलीची आठवण काढत असतो. काही दिवसांपूर्वीच शमीने त्याच्या मुलीचा डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात शमीच्या पत्नीने शमीवर गंभीर आरोप केले होते. मोहम्मद शमीवर मारहाण, बलात्कार, हत्येचा प्रयत्न, मॅच फॅक्सिंग यासारखे अनेक गंभीर आरोप केले होते. शमीने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. शमीवर केलेले आरोप तीच्या पत्नीला अद्यापही सिद्ध करता आलेले नाही.