टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी 'या' व्हिडीओमुळे होते ट्रोल

मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांने 1983मधील आशिक आवारा या सिनेमातील गाण्यावर तिने व्हिडीओ केला आहे. 

Updated: Apr 14, 2021, 03:09 PM IST
टीम इंडियाचा गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी 'या' व्हिडीओमुळे होते ट्रोल title=

मुंबई: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी सोशल मीडियावर खूप जास्त अॅक्टीव असते. तिने टिकटॉकवर केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानं नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. तिच्या या व्हिडीओनंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहांने 1983मधील आशिक आवारा या सिनेमातील गाण्यावर तिने व्हिडीओ केला आहे. 'आज मुझे इसी वक्त यह मुझको पता चला है...' या गाण्यावर व्हिडीओ करून पोस्ट करताच नेटकऱ्यांनी त्यावर अनेक कमेंट्स केल्या. काहींनी तर ट्रोलही केलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by hasin jahan (@hasinjahanofficial)

शमी भाई सोडून कोणावर प्रेम झालं? कोण आहे सांग असे अनेक प्रश्न विचारून नेटकऱ्यांनी हसीन जहांला भंडावून सोडलं. मात्र तिने त्यावर कोणतंही उत्तर दिल्याचं दिसलं नाही. या व्हिडीओमुळे मात्र सोशल मीडियावर तिची तुफान चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

 

मोहम्मद शमीची पत्नी इन्टावर खूप जास्त अॅक्टीव असते.  सध्या शमी आणि हसीन वेगवेगळे राहतात. हसीनने शमीवर गंभीर आरोप केले होते. त्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप देखील लावण्यात आला होता. या दोघांमध्ये मुलाचा कस्टडीवरून सध्या वाद सुरू आहेत.