Arjun Tendulkar ला खरेदी केल्यानंतर प्रश्न उपस्थित, Mumbai Indians ने दिले हे कारण?

मुंबई इंडियन्सने IPL Auction 2021च्या लिलावात अर्जुनला खरेदी केले. या युवा अष्टपैलू खेळाडूची खरेदी झाल्यानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली.  

Updated: Feb 19, 2021, 02:52 PM IST
Arjun Tendulkar ला खरेदी केल्यानंतर प्रश्न उपस्थित, Mumbai Indians ने दिले हे कारण?   title=
संग्रहित छाया

मुंबई : भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) ची क्रिकेट कारकीर्द अधिक मजबूत झाली ती म्हणजे मुंबई इंडियन्सने IPL Auction 2021च्या लिलावात खरेदी केली तेव्हा. या युवा अष्टपैलू खेळाडूची खरेदी झाल्यानंतर अनेकांनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मुंबई इंडियन्सने अर्जुनच्या खरेदीचे कारण सांगितले.

मुंबईने अर्जुनची 20 लाखात केली खरेदी

मुंबई इंडियन्सकडून खेळल्यानंतर सचिन आता या संघात मेंटरची भूमिका निभावत आहे आणि त्याच फ्रेंचायझीने अर्जुनला त्याच्या 20 लाख रुपयांच्या बेस प्राइसवर विकत घेतले. सचिन तेंडुलकरचा मुलगा असल्याने अर्जुन तेंडुलकरवरही वेगळ्या प्रकारचा दबाव होता.

मुंबई इंडियन्सने दिली ही प्रतिक्रिया 

अर्जुन तेंडुलकरला विकत घेतल्यानंतर मुंबई इंडियन्सने आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने म्हणाले, अर्जुन तेंडुलकरची निवड त्यांच्या कौशल्यामुळे टीमने केली होती. अर्जुनला मुंबई इंडियन्समध्ये बरेच काही शिकायला मिळेल. कालांतराने अर्जुन आपला खेळ सुधारेल.

जयवर्धनेने हेही स्पष्ट केले की, अर्जुन तेंडुलकरच्या डोक्यावर एक मोठा टॅग लागणार आहे. सचिन तेंडुलकर असल्यामुळे तो गोलंदाज आहे, फलंदाज नाही. अर्जुनला शिकण्याची ही मोठी संधी आहे. तो अजूनही तरुण आहे.

सचिनमुळे संधी मिळाली?

मुंबई इंडियन्सचे डायरेक्टर झहीर खान म्हणाले की, 'अर्जुन तेंडुलकर खूप मेहनती आहे, त्याला खूप काही शिकायचं आहे, ही सर्वात रोमांचक गोष्ट आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा होण्याचा अतिरिक्त दबाव त्याच्यावर कायमच राहतो, हे असेच आहे. यावातावरणात त्याला वावरावे लागणार आहे. संघाचे वातावरण त्याला मदत करेल.

गेल्या दोन ते तीन हंगामात अर्जुन तेंडुलकर नेट बॉलरची भूमिका साकारत होता. 21वर्षीय अर्जुनने नुकताच हरियाणाविरूद्ध सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबईच्या वरिष्ठ संघाकडून पदार्पण केले.