WPL 2025 Retention : आयपीएलनंतर आता मागील दोन वर्षांपासून भारतात होणाऱ्या वुमन्स प्रीमियर लीगच्या (WPL 2025) नव्या सीजनसाठी सर्व संघानी रिटेन्शन लिस्ट जाहीर केली आहे. यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet kaur) सह 14 खेळाडूंना रिटेन केलं असून यात भारतासह विदेशी खेळाडूंचाही समावेश आहे. मात्र या दरम्यान मुंबईने WPL च्या इतिहासातील पहिली हॅट्रिक घेणाऱ्या स्टार बॉलरला मात्र रिलीज केलं आहे.
मुंबई इंडियन्सने वुमन्स प्रीमियर लीग 2025 साठी तब्बल 14 खेळाडूंना रिटेन केलं असून फक्त 4 खेळाडूंना रिलीज केलं आहे. मुंबईने हरमनप्रीत कौर, यस्तिका भाटिया, नपूजा वस्त्राकर, संजना सजीवन,अमनजोत कौर, साइका इशाक या भारतीय खेळाडूंना तर विदेशी खेळाडूंपैकी नट साइवर, हीली मैथ्यूज, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन यांना रिटेन केलं आहे. तर मुंबईने रिलीज केलेल्या खेळाडूंमध्ये हुमैरा काझी, फातिमा जाफर, इस्सी वोंग आणि प्रियांका बाला यांचा समावेश आहे. मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये सध्या 2.65 कोटी रुपये आहेत.
मुंबई इंडियन्सने वुमन्स प्रीमियर लीगमध्ये पहिल्यांदाच हॅट्रिक घेणारी गोलंदाज इस्सी वोंग हिला रिलीज केलं आहे. इस्सी वोंग हिने वुमन्स प्रीमियर लीगच्या दुसरा सीजनला यूपी वॉरियर्स विरुद्ध खेळताना लागोपाठ तीन विकेट्स घेऊन हॅट्रिक नावावर केली होती. ही वुमन्स प्रीमियर लीगमधील सर्वात पहिली हॅट्रिक ठरली. मात्र याच वेगवान गोलंदाज इस्सी वोंगला मुंबईने रिलीज केलं आहे.
वुमन्स प्रीमियर लीगची सुरुवात 2023 मध्ये झाली पहिल्याच वर्षी हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने WPL चे विजेतेपद पटकावले. तर WPL 2024 दुसरा सीजन सुद्धा मुंबईसाठी चांगला राहिला. यात त्यांनी एकूण 8 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला तर 3 सामन्यात त्यांचा पराभव झाला. यात मुंबई इंडियन्स पॉईंट्स टेबलमध्ये नंबर 2 वर राहिली. तसेच त्यांनी प्लेऑफमध्ये क्वालिफाय सुद्धा केले. मात्र त्यांचा एलिमिनेटर सामन्यात पराभव झाला. त्यांना रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुकडून 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
हेही वाचा : BCCI च्या नव्या नियमांचा 'या' स्टार खेळाडूला फटका, एका निर्णयामुळे 2 वर्ष IPL खेळण्यावर लागली बंदी
हरमनप्रीत कौर (कर्णधार), पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, नट साइवर-ब्रंट, हीली मैथ्यूज, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन, अमनजोत कौर, साइका इशाक, जिंतिमनी कलिता, एस सजना, कीर्तन बालाकृष्णन, शबनीम इस्माइल
प्रियंका बाला, हुमैरा काजी, फातिमा जाफ़र, इस्सी वोंग
RWA
(20 ov) 125/5
|
VS |
BRN
126/3(18.1 ov)
|
Bahrain beat Rwanda by 7 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 139/7
|
VS |
BRN
140/1(15.1 ov)
|
Bahrain beat Malawi by 9 wickets | ||
Full Scorecard → |
QAT
(20 ov) 189/4
|
VS |
SDA
193/6(19.2 ov)
|
Saudi Arabia beat Qatar by 4 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.