मुंबई : आयपीएलच्या इतिहासात सगळ्यात यशस्वी कर्णधार पाहिला तर सर्वांचं उत्तर जवळपास सारखंच असेल आणि ते म्हणजे रोहित शर्मा. तर दुसरीकडे मुंबईला आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम देखील मानलं जातं. आतापर्यंत 5 आयपीएल ट्रॉफी जिंकल्याचा विक्रम या टीमच्या नावे आहे. या टीमच्या यशस्वीपणाचं रहस्य म्हणजे टीम मॅनेजमेंटचा खेळाडूंवर असलेला विश्वास.
मुंबई इंडियन्सकडे सध्याच्या परिस्थितीत देखील अनेक मॅचविनर खेळाडू आहेत. ज्यामध्ये रोहितसह जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव यांचा समावेश आहे. मात्र अजूनही असे काही खेळाडू आहेत, ज्यांच्यावर मुंबई इंडियन्स कधीही विश्वास दाखवला नाही. हेच खेळाडू मात्र दुसऱ्या टीममधून चांगला खेळ करत असल्याचं दिसून आलं आहे. कोण आहेत असे खेळाडू पाहूयात.
टी-20 फॉर्मेटमीळ धडाकेबाज फलंदाज म्हटलं की, ग्लेन मॅक्सवेलचं नाव घेण्यात येतं. मॅक्सवेल असा खेळाडू जो काही चेंडूंमध्ये संपूर्ण सामन्याचं रूप पालटू शकतं. आयपीएल 13 मध्ये मुंबईने मॅक्सवेलला खरेदी केलं होतं. मात्र त्यावेळी त्याला केवळ 3 सामने खेळण्याची संधी दिली. यानंतर 2014 मध्ये त्याला टीममधून रिलीज करण्यात आलं.
क्रिस लिन टी-20 फॉर्मेटमधील असं एक नाव आहे ज्याला अनेक गोलंदाज घाबरतात. मात्र या खेळाडूला कधीही मुंबई इंडियन्स टीमने मॅचविनर समजलं नाही. 2020 मध्ये या खेळाडूला मुंबईने ऑक्शनमध्ये आपल्या ताब्यात घेतलं होतं. त्या सिझनमध्ये लिनला एकंही सामना खेळण्याची संधी देण्यात आली नाही. 2021मध्ये क्विंटन डि कॉक नसल्यामुळे त्याला खेळवण्यात आलं होतं.
सध्याच्या घडीला सर्वात उत्तम टी-20 मध्ये भारताचा स्पिनर म्हणून युझवेंद्र चहलचं नाव घेण्यात येतं. आयपीएलमध्ये आरसीबीकडून हा खेळाडू खेळतो. मात्र त्यापूर्वी तो मुंबई इंडियन्सचा भाग होता. 2011 ते 2013 मध्ये चहल मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात होता. मात्र त्यावेळी त्याला केवळ एकच सामना खेळण्याची संधी देण्यात आली होती. आता चहल राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसणार आहे.