हे घडणारच होतं...BCCI टीम इंडियामध्ये संधी देत नाही म्हणून 'हा' खेळाडू दुसऱ्या देशाकडून खेळताना दिसणार!

मात्र लवकरच यामध्ये अजून एका भारतीय खेळाडूचं नाव जोडलं जाणार आहे. हा खेळाडू भविष्यात दुसऱ्या देशाकडून खेळताना दिसणार आहे.

Updated: Jan 14, 2023, 05:39 PM IST
हे घडणारच होतं...BCCI टीम इंडियामध्ये संधी देत नाही म्हणून 'हा' खेळाडू दुसऱ्या देशाकडून खेळताना दिसणार! title=

Murli Vijay : भारतीय क्रिकेट टीममध्ये (Team India) सध्या निवड होण्यासाठी टोकाची स्पर्धा करावी लागतेय. चांगला खेळ करून देखील अनेक खेळाडूंना टीममध्ये जागा मिळत नाहीये. परिणामी यामुळे अनेक खेळाडू हताश होऊन कमी वयातच निवृत्ती घेतायत. अशामध्ये काही खेळाडू दुसऱ्या देशाकडून खेळण्याचा देखील विचार करतात. यामध्ये उन्मुक्त चंद हे नाव प्रत्येकाच्या तोंडात येतं. मात्र लवकरच यामध्ये अजून एका भारतीय खेळाडूचं नाव जोडलं जाणार आहे. हा खेळाडू भविष्यात दुसऱ्या देशाकडून खेळताना दिसणार आहे.

या खेळाडूचा BCCI विरूद्ध मोर्चा?

टीम इंडियाचा खेळाडू मुरली विजय (Murli Vijay) भविष्यात दुसऱ्या देशाकडून खेळणार असल्याची सध्या चर्चा आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याने पदार्पण केलं होतं. मात्र गेल्या 4 वर्षांपासून त्याने भारतासाठी एकंही सामना खेळला नाहीये. 2015 साली इंग्लंडविरूद्धच्या सिरीजमध्ये उत्तम फलंदाज म्हणून खेळ केलाय. 

मुरली विजय आता 38 वर्षांचा धाला आहे. अशातच त्याने त्याच्या करियरबाबत मोठं विधान दिलं आहे. ज्यामध्ये मुरली विजने संकेत दिले आहेत की, तो भविष्यात दुसऱ्या देशाकडून खेळण्यासाठी संधी शोधतोय. एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना त्याने हे संकेत दिले आहेत.

मुरली विजयने सांगितलं की, बीसीसीआयसोबत माझी साथ आता जवळपास पूर्ण झाली आहे. त्यामुळे मी आता विदेशात संधी शोधतोय. मी आता प्रतिस्पर्धी क्रिकेट खेळू इच्छितो.

मला अजुनही क्रिकेट खेळायचंय. एकदा भारतात खेळाडूने वयाची तिशी ओलांडली की त्याचा फारसा विचार केला जात नाही. माझ्या मताने, आमच्याकडे मला रस्त्यावरून चालणाता लोकं माझ्याकडे 80 वर्षाच्या म्हाताऱ्यासारखे पाहतात. प्रसारमाध्यमांनीही याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहणं गरजेचं आहे, असंही मुरली विजय याने म्हटलंय. 

मुरली पुढे म्हणतो, संधी मिळाली तर मी सर्वोत्तम फलंदाजी करु शकतो. परंतु दुर्दैवाने आता संधी एकदम कमी आहेत, त्यामुळे मला आता बाहेरचा विचार करावा लागणार आहे. 

मुरली विजयने 2018 साली भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अखेरचं टेस्ट क्रिकेट खेळलं आहे. भारताकडून 61 टेस्ट सामन्यांमध्ये मुरली विजयने 3 हजार 982 रन्स केलेत. ज्यामध्ये 12 शतकं आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. याव्यतिरीक्त मुरली विजयने भारताकडून 17 वन-डे सामनेही खेळलेत.