कर्णधार पृथ्वीच्या विश्वासावर खरा उतरला हा बॉलर

१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीलाच कांगारुंना दणका देत सामन्यावर पकड मजबूत केली. ऑस्ट्रेलियाच्या झटपट तीन विकेट घेण्यात भारतीय टीमला यश आलं.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 3, 2018, 11:57 AM IST
कर्णधार पृथ्वीच्या विश्वासावर खरा उतरला हा बॉलर title=

डरबन : १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीलाच कांगारुंना दणका देत सामन्यावर पकड मजबूत केली. ऑस्ट्रेलियाच्या झटपट तीन विकेट घेण्यात भारतीय टीमला यश आलं.

बॉलर्सची चांगली कामगिरी

राजस्थानचा स्टार युवा गोलंदाज कमलेश नागरकोटीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंडर-19 वर्ल्ड कप फायनल सामन्यात पुन्हा एकदा कमाल केली आहे. कमलेशने फायनल सामन्यात 9 ओव्हरमध्ये 41 रन देत ऑस्ट्रेलियाचे 2 महत्त्वाचे विकेट घेतले. नागरकोटीने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जेसन सांघाला 13 रनवर आऊट केलं. जॅक ईवान्सला त्याने 1 रनवर आऊट केलं. सोबतच त्याने चांगली फिल्डींग देखील केली.

नागकोटीने नाही केलं निराश

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत प्रथम बॅटींगचा निर्णय घेतला. 32 रनपर्यंत त्यांनी चांगली बॅटींग केली. ईशान पोरलने दोन्ही ओपनर खेळाडूंना माघारी पाठवलं. कर्णधार पृथ्वी शॉने बॉलिंगमध्ये बदल करत नागरकोटीच्या हातात बॉल दिला. नागरकोटीने देखील त्याला निराश नाही केली. पहिल्याच ओव्हारमध्ये त्याने कर्णधार सांघाला आऊट केलं.

फायनलच्या आधी कर्णधार शॉने म्हटलं की, 'फास्टर बॉलर्सचा शानदार फॉर्म ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजयासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. संघाला गरज असतांना त्यांनी यश मिळवून दिलं. त्यांची फिटनेस चांगली आहे. प्रत्येक वेळेस त्यांनी चांगली कामगिरी केली आहे.'