NZ vs NED : याला म्हणतात फिल्डिंग! बॉन्ड्रीलाईनवर ट्रेंड बोल्टने टिपला सुंदर कॅच; पाहा Video

New Zealand vs Netherlands : न्यूझीलंड आणि नेदरलँड यांच्यातील सामन्यात रचिन रवींद्रच्या (Rachin Ravindra) बॉलवर  बास डी लीडे (Bas de Leede) याने खणखणीत फटका मारला. मात्र, त्याचवेळी ट्रेंड बोल्ट (Trent Boult) याने अप्रतिम कॅच पकडला.

Updated: Oct 9, 2023, 09:38 PM IST
NZ vs NED : याला म्हणतात फिल्डिंग! बॉन्ड्रीलाईनवर ट्रेंड बोल्टने टिपला सुंदर कॅच; पाहा Video title=
NZ vs NED, Trent Boult, Catch Video

Trent Boult Catch Video : सध्या न्यूझीलंड आणि नेदरलँड (New Zealand vs Netherlands) यांच्यात हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर वर्ल्ड कपचा (World Cup) 6 वा सामना खेळवला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने दिलेल्या 323 धावांचं आव्हान पार करताना नेदरलँडने कडवी झुंज दिली. मात्र, त्यांना टार्गेट पूर्ण करता आलं नाही. अखेर न्यूझीलंडने हा सामना 99 धावांनी जिंकला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 322 धावा चोपल्या. न्यूझीलंडकडून विल यंगने 70 धावांची खेळी केली होती. तर मिशेल सँटनरने 5 गडी बाद केले. न्यूझीलंडला प्रत्युत्तर देताना नेदरलँडचे फलंदाज एकामागोमाग एक बाद होत गेले, त्याला कारण न्यूझीलंडची फिल्डिंग. न्यूझीलंडने आक्रमक फिल्डिंगचं प्रदर्शन करत नेदरलँडला धावा करू दिल्या नाहीत. अशातच आता ट्रेंड बोल्टचा एक सुंदर कॅच (Trent Boult Catch) सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 

न्यूझीलंडने दिलेल्या 323 धावांचं आव्हान पार करताना नेदरलँडची सुरूवात चांगली झाली नाही. त्यांचे फलंदाज झटपट गारद झाले. सामन्याच्या 17 व्या ओव्हरमध्ये नेदरलँडचे 3 फलंदाज तंबूत परतले होते. सामन्याची 17 वी ओव्हर घेऊन रचिन रविंद्र याला बोलवण्यात आलं. त्याच्या 4 थ्या बॉलवर बास डी लीडे (Bas de Leede) याने खणखणीत फटका मारला. मात्र, त्याचवेळी ट्रेंड बोल्ट (Trent Boult) बॉन्ड्रीलाईनच्या जवळ उभा होता. बोल्टने संधी सोडली नाही आणि अप्रतिम कॅच घेतला. त्याचा व्हिडीओ (Viral Video) आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा Video

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

न्यूझीलंड : डेव्हॉन कॉनवे, विल यंग,​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट.

नेदरलँड: विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ'डॉड, कॉलिन अकरमन, बास डी लीडे, तेजा निदामानुरु, स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), सायब्रँड एंजेलब्रेक्ट, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, रायन क्लेन, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकरेन.