वर्ल्ड टूर फायनल जिंकत पी.व्ही सिंधुने रचला इतिहास

शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

Updated: Dec 16, 2018, 01:10 PM IST
वर्ल्ड टूर फायनल जिंकत पी.व्ही सिंधुने रचला इतिहास

मुंबई : भारताची स्टार खेळाडू पी.व्ही सिंधूने वर्ल्ड टूर फायनल्सचा खिताब जिंकत इतिहास रचला आहे. रविवारी झालेल्य़ा या महिला एकेरी फायनलमध्ये तिने जपानच्या नोजोमी ओकुहाराचा 21-19, 21-17 ने पराभव केला. मागच्या वर्षी झालेल्या फायनलमध्ये याच दोन्ही खेळाडूंमध्य़े सामना झाला होता. ज्यामध्ये ओकुहाराने सिंधुचा पराभव केला होता.

सिंधूने या सामन्यात सुरुवाती पासूनचज आक्रमक खेळी केली. यामन्यात पहिला गुण ओकुहाराने जिंकला पण सिंधूने वापसी करत आघाडी घेतली. आपल्या उंचीचा देखील तिने यावेळी चांगला फायदा केला. सिंधु 5-1 ने पुढे होती. त्यानंतर ओकुहाराने वापसी करत गुण 7-5 वर आणले. यानंतर सिंधूने चांगला कोर्ट कवर केलं आणि नोजोमी ओकुहाराच्या चुकांचा फायदा घेत पहिला गेम ब्रेकपर्यंत सिंधूने 11-6 पर्यंत आघाडी घेतली.

ब्रेकनंतर सिंधूने 14-6 ने आघाडी घेतली. आता सिंधू सहज हा गेम जिंकेल असं वाटत होतं पण जपानच्या खेळाडूने पुन्हा वापसी केली आणि 16-16 ने बरोबरी केली. कांटे की टक्कर सुरु होती. यानंतर सिंधूने 20-17 ने आघाडी घेतली. ओकुहाराने पुन्ही 2 गुण घेतले आणि चुरस आणखी वाढली. पण शेवटी सिंधूने कमाल केली आणि पहिला गेम 21-19 ने आपल्या नावे केला.

दुसरा गेम सिंधूने 3 अंक घेत सुरु केला. ओकुहाराने या नंतर जबरदस्त खेळी केली. गुण 11-9 वर पोहोचले. अंतर फार कमी होतं. शेवटी सिंधूने 21-17 ने दुसरा गेम देखील आपल्या नावे करत फायनल जिंकली.