PSL स्पॉट फिक्सिंग : शाहजब हसनवर एक वर्षाची बंदी, १० लाखांचा दंड

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पॉट फिक्सिंग प्रकरणी गोलंदाज शाहजब हसनवर एक वर्षांची बंदी घालण्यात आलीये. क्रिकइन्फोच्या माहितीनुसार गेल्या वर्षी झालेल्या पाकिस्तान सुपर लीग(पीएसएल) दरम्यान, हसनवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप ठेवण्यात आला होता. 

Updated: Mar 1, 2018, 12:03 PM IST
PSL स्पॉट फिक्सिंग : शाहजब हसनवर एक वर्षाची बंदी, १० लाखांचा दंड

लाहोर : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पॉट फिक्सिंग प्रकरणी गोलंदाज शाहजब हसनवर एक वर्षांची बंदी घालण्यात आलीये. क्रिकइन्फोच्या माहितीनुसार गेल्या वर्षी झालेल्या पाकिस्तान सुपर लीग(पीएसएल) दरम्यान, हसनवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप ठेवण्यात आला होता. 

पीसीबीने बुधवारी याबाबतचा निर्णय सुनावला. हसनने आचारसंहितेच्या नियम २.४.४ आणि २.४.५ चे उल्लंघन केलेय. यात तो स्पॉट फिक्सिंगची माहिती लवपण्याप्रकरणी दोषी ठरलाय. हे प्रकरण गेल्या वर्षी पीएसएलच्या सुरुवातीला फ्रेब्रुवारीमध्ये समोर आले होते. 

शाहजबला पीसीबीने गेल्या वर्षी १८ मार्चला निलंबित केले होते. हसनवर १० लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय. शाहजाब पीएसएलमध्ये कराची किंग्ज टीममधून खेळत होता. 

शाहजाबला क्रिकेटच्या मैदानावर परतायचे असल्यास त्याला रिहॅबिलिटेशन प्रक्रियेमधून जावे लागेल. तसेच त्याला दंडही भरावा लागेल. 

पीसीबीचे कायदेशीर सल्लागार तफाजुल रिजवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहजाबवर घालण्यात आलेली बंदी १७ मार्चला संपेल. मात्र भ्रष्टाचार विरोधी नियमानुसार त्या खेळाडूला पुनसुर्धार प्रक्रियेतून जावे लागेल. रिहॅबिलिटेशनच्या प्रक्रियेतील पहिले पाऊल म्हणजे आरोप स्वीकारणे. जर त्या खेळाडूने आपल्यावरील आरोप स्वीकारले नाहीत तर त्याची रिहॅब प्रक्रिया सुरु होऊ शकत नाही.