'ही तर भारतीयांची...', इंजमामनं काढली भारताच्या जखमेवरची खपली!

पाकिस्तान हवेतच गेलीये, भारताच्या पराभावनंतर इंजमाम उल हकनेही ओकली गरळ!

Updated: Nov 12, 2022, 07:34 PM IST
'ही तर भारतीयांची...', इंजमामनं काढली भारताच्या जखमेवरची खपली! title=

T-20 World Cup 2022 : टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचा इंग्लंडकडून (ind vs eng) मानाहानिकारक पराभव झाला. या पराभवाने भारताचं वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. या पराभवाची सल भारतीयांच्या मनात कायम राहणार आहे. या पराभवामुळे आयतं कोलीत मिळालेल्या पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इंजमाम उल हकनं (Inzamam ul Haq) जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे.  (Pakistan former cricketer Inzamam ul Haq criticized the Indian team marathi sport news)

 

जेव्हा जेव्हा एखादा मोठा सामना असतो तेव्हा भारतीय संघाला अडचणीचा सामना करावा लागतो आणि हे मी आशिया चषकापासून पाहत आलो आहे. जोस बटलर आणि ॲलेक्स हेल्स यांनी चमकदार कामगिरी केली. मात्र, भारताच्या गोलंदाजीपेक्षा आमचा गोलंदाज संघ खूपच सरस आहे. आमच्या संघाचे गोलंदाज इंग्लंडच्या फलंदाजांना क्रीजवर स्थिरावण्याची संधी देणार नाहीत आणि आम्ही अंतिम फेरीत आणखी चांगली कामगिरी करू, असं इंजमाम उल हकने म्हटलं आहे.

भारताने पात्रता फेरीमध्ये पाकिस्तानचा पराभव केला होता त्यावेळी इंजमाम उल हकने विराट खेळाडूचं कौतुक केलं होतं. विराट ज्या पद्धतीने खेळला ते शानदार आहे. विराट हा फक्त अशा प्रकारचा खेळाडू आहे अशी कामगिरी तोच करू शकतो, असं इंजमाम उल हक म्हणाला होता. 

दरम्यान, फायनलमधील इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये कोणता संघ बाजी मारतो याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये हा सामना होणार आहे.