IND v PAK Playing XI : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना उद्या खेळवला जाणार आहे. पारंपारिक विरोधी दोन संघातील सामना पाहण्यासाठी वाट जगभरात पाहिली जात आहे. उभय संघांतील शनिवारचा सामना दुपारी 3.30 मिनिटांनी सुरू होणार आहेत. अर्धातास आधी टॉस उडवला जाणार आहे. त्यावेळी दोन्ही संघात कोण खेळणार? यावर शिक्कामोर्तब होणार होतं. मात्र, सामन्याच्या एक दिवस आधीच पाकिस्तान संघाने आपले पत्ते उघडले आहेत. पाकिस्तान संघाने भारताविरुद्ध प्लेइंग इलेव्हन (Pakistan team announced Playing XI) जाहीर केली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) ट्विट करत पाकिस्तानचा संघ जाहीर केला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचा आत्मविश्वास सातव्या आसमानावर असल्याचं पहायला मिळतंय. तर दुसरीकडे रोहित शर्मा माईंड गेम खेळताना दिसतोय. उद्या सामन्यात पावसाचा अंदाज असल्याने रोहित शर्मा मैदानाचा आढावा घेऊन पाकिस्तानविरुद्ध टीम घोषित करू शकतो.
Pakistan to field same playing XI tomorrow #PAKvIND | #AsiaCup2023 pic.twitter.com/qe18Ad6pF4
— Pakistan Cricket (@TheRealPCB) September 1, 2023
बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर झमान, इमाम उल हक, सलमान अली आघा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), मोहम्मद नवाझ, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि हरीस रौफ.
दरम्यान, भारताविरुद्ध सामन्यासाठी बाबर आझम पाकिस्तान क्रिकेट टीमचं कर्णधारपद सांभाळणार आहे. तर शादाब खान हा उपकर्णधार आहे. तर विकेटकिपरची कमान मोहम्मद रिझवान सांभाळेल. पाकिस्तानने नेपाळविरुद्ध देखील प्लेइंग इलेव्हन आदल्या दिवशी जाहीर केली होती. त्यानंतर आता भारताविरुद्धची टीम जाहीर झाली आहे. बाबर आझम आणि इफ्तिखार अहमद यांनी नेपाळविरुद्ध शतकीय पारी खेळली होती. त्यामुळे टीम इंडियाला दोन्ही खेळाडूंपासून सांभाळून खेळावं लागणार आहे.
Accu Weather च्या अहवालानुसार, शनिवारी म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कँडी शहरात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या ठिकाणी 70 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. सामना झाला तर टी-ट्वेंटी फॉरमॅटमध्ये खेळवला जाईल, अशी शक्यता क्रिडातज्ज्ञांनी वर्तविली आहे.