लंडनच्या रस्त्यावर Dhoni ला पाहण्यासाठी लोकांची धावपळ, सुरक्षा रक्षकांची दमछाक

धोनीला सामना पाहण्यासाठी लंडनमध्ये पहोचला आहे. येथेच त्याने आपला 41 वाढदिवस ही साजरा केला.

Updated: Jul 16, 2022, 10:53 PM IST
लंडनच्या रस्त्यावर Dhoni ला पाहण्यासाठी लोकांची धावपळ, सुरक्षा रक्षकांची दमछाक title=

लंडन : टीम इंडियाचे दोन मोठे स्टार महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना लंडनमध्ये सामना पाहण्यासाठी एकत्र आले होते. मात्र, दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा 100 धावांनी पराभव झाला. यावेळी इंग्लंडमध्ये अनेक दिग्गज खेळाडू आहेत. भारत-इंग्लंड मालिकेतील सामना पाहण्यासाठी हरभजन सिंग, सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकरही आले होते.

धोनीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. धोनीला पाहण्यासाठी आणि त्याचे फोटो काढण्यासाठी एकच गर्दी झाली होती. यावेळी लोकांपासून लांब ठेवताना त्याच्या सुरक्षा रक्षकांची चांगलीच दमछाक झालेली पाहायला मिळाली.

 

धोनीचा वाढदिवस लंडनमध्येच साजरा

धोनीने 7 जुलै रोजी लंडनमध्येच त्याचा 41 वा वाढदिवस साजरा केला. विम्बल्डन येथे सामना पाहण्यासाठी तो आला होता. धोनीची पत्नी साक्षीने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे व्हिडिओ-फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतही फोटोत दिसत होता.

तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार

महेंद्रसिंग धोनी हा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने आपल्या नेतृत्वाखाली भारतासाठी तीन आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत. यामध्ये 2007 टी-20 विश्वचषक, 2011 एकदिवसीय विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे. त्याच्या नेतृत्वाखालीच भारत कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला. धोनीने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 2019 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत तो अखेरचा निळ्या जर्सीत दिसला होता.