'डियर टीम इंडिया...', वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खास मेसेज!

Australia Won World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडने दमदार फलंदाजी करत वर्ल्ड कपवर ऑस्ट्रेलियाचं नाव कोरलं आहे. टीम इंडियाच्या पराभावानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पोस्ट करत टीम इंडियाचं सांत्वन केलं आहे.

सौरभ तळेकर | Updated: Nov 19, 2023, 11:04 PM IST
'डियर टीम इंडिया...', वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खास मेसेज! title=
Modi consolation Team Ind

PM Narendra Modi consolation Team India : अहमदाबादच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 6 गडी राखून पराभव केला आहे. अवघ्या 240 धावांचा आव्हान घेऊन उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने अवघ्या चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये पार करताना भारतापासून विश्वचषक दूर नेला. विराट कोहली आणि लोकेश राहुल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने 240 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडने दमदार फलंदाजी करत वर्ल्ड कपवर ऑस्ट्रेलियाचं नाव कोरलं आहे. टीम इंडियाच्या पराभावानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोस्ट करत टीम इंडियाचं सांत्वन केलं आहे.

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

प्रिय टीम इंडिया, विश्वचषक स्पर्धेत तुमची प्रतिभा आणि जिद्द लक्षात घेण्याजोगी होती. तुम्ही मोठ्या भावनेने खेळलात आणि देशाला मोठा अभिमान मिळवून दिला. आम्ही आज आणि सदैव तुमच्या पाठीशी उभे आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलं आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचं देखील कौतूक केलं आहे.

विश्वचषकातील शानदार विजयाबद्दल ऑस्ट्रेलियाचे अभिनंदन! स्पर्धेतील त्यांची प्रशंसनीय कामगिरी होती, ज्याचा शेवट शानदार विजयात झाला. आजच्या उल्लेखनीय खेळाबद्दल ट्रॅव्हिस हेडचे अभिनंदन, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी कांगारूंचं अभिनंदन केलंय.

ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.