Pro Kabaddi League: बंगाल वॉरियर्स कडून हरियाणा स्टीलर्सला पराभवाचा धक्का, संघावर 39-32 अशी केली मात

Bengal Warriors vs Haryana Steelers: बंगाल वॉरियर्स संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या हरियाणा स्टीलर्स संघावर 39-32 अशी मात करीत प्रो कबड्डी स्पर्धेत अनपेक्षित निकाल नोंदवला. 

तेजश्री गायकवाड | Updated: Dec 5, 2024, 01:07 PM IST
Pro Kabaddi League: बंगाल वॉरियर्स कडून हरियाणा स्टीलर्सला पराभवाचा धक्का, संघावर 39-32 अशी केली मात

PKL 11: खोलवर चढाया आणि  भक्कम पकडी असा चतुरस्त्र खेळ करीत बंगाल वॉरियर्स संघाने गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या हरियाणा स्टीलर्स संघावर 39-32 अशी मात करीत प्रो कबड्डी स्पर्धेत अनपेक्षित निकाल नोंदविला. पूर्वार्धात हा सामना १७-१७ असा बरोबरीत होता.

Add Zee News as a Preferred Source

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या सामन्या इतकाच हरियाणा स्टीलर्स व बंगाल वॉरियर्स यांच्यातील सामना विलक्षण चुरशीने खेळला गेला. दोन्ही संघांमध्ये सुरुवातीपासूनच आघाडी घेण्यासाठी सतत चढाओढ दिसून आली. हरियाणा संघाकडून विनय व शिवम पठारे यांनी खोलवर चढाया केल्या तर बंगाल संघाकडून मनिंदर सिंग व प्रणय राणे यांनी जोरदार चढाया करीत अधिकाधिक गुण वसूल करण्याचे प्रयत्न केले.‌ पूर्वार्धात काही सेकंद बाकी असताना बंगाल वारियर्सने लोण नोंदवित १७-१७ अशी बरोबरी साधली. मध्यंतराला हीच बरोबरी होती. 

हे ही वाचा: हृदयद्रावक! ८ दिवसांवर लग्न पण काळाने घात केला; कुमार महाराष्ट्र केसरी विजेत्याचे अचानक निधन

 

 हे ही वाचा: Junior Asia Cup: विजेतेपदाची हॅट्ट्रिक! भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानला हरवत रचला इतिहास

 

उत्तरार्धात कसा रंगला सामना? 

उत्तरार्धातही दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध आघाडी घेण्याचे सातत्याने प्रयत्न केले. शेवटची चार मिनिटे बाकी असताना बंगाल वारियर्सने ३३-२७ अशी आघाडी घेतली होती. त्यांनीही आघाडी वाढवीत सामन्यावरील पकड घट्ट केली होती. अखेर ही लढत त्यांनी ३९-३२ अशी जिंकली. त्यांच्याकडून मनिंदर सिंग (११ गुण) व प्रणय राणे (६ गुण) यांनी जोरदार चढाया केल्या. मनजीत व फाझल अत्राचेली यांनी प्रत्येकी तीन गुण नोंदविले. पराभूत संघाकडून विनय (दहा गुण) व शिवम कटारे (८ गुण)यांची लढत अपुरी पडली.

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More