पृथ्वीच्या बॅटने नाही केली कमाल पण कॅचने उडवली धमाल

 फाइन लेगला उभ्या असणाऱ्या पृथ्वीने धावून एक शानदार कॅच पकडली. या कॅच नंतर मॅच बदलली पण..

Updated: May 13, 2018, 02:15 PM IST
पृथ्वीच्या बॅटने नाही केली कमाल पण कॅचने उडवली धमाल title=
नवी दिल्ली : कॅप्टन कोहली आणि डिवीलियर्सच्या फटकेबाजीमुळे आरसीबी आयपीएल ११ च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या प्रयत्नात आहे. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानात बंगळूरच्या टीमने दिल्लीच्या टीमला पाच विकेट्सने हरविले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीच्या टीमने २० ओव्हरमध्ये चार विकेट्सच्या बदल्यात १८१ रन्स बनविले. ज्यामध्ये ऋषभ पंतने ६१ तर आपली पहिली मॅच खेळणाऱ्या अभिषेक शर्माने ४६ रन्स केले. या स्कोअरच उत्तर देणाऱ्या दिल्लीची सुरूवात खराब झाली. त्यांच्या स्टाइलिश बॅट्समन पृथ्वी शॉ आपल्या बॅटने काही कमाल दाखवू शकला नाही.केवळ १६ रन्सवर दिल्लीच्या टीमने त्याला रोखले.

कॅचने बदलली मॅच पण..

पृथ्वी बॅटने कमाल करु शकला नाही पण दोन शानदार कॅच पकडून तो सर्वांच्या लक्षात राहिला. त्याने एवढी सुंदर कॅच पकडली की कोणाचीच नजर कॅचवरून हटली नाही. आरसीबीच्या १८ व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलला सरफराजने किपरच्या बाजुने खेळण्याचा प्रयत्न केला. फाइन लेगला उभ्या असणाऱ्या पृथ्वीने धावून एक शानदार कॅच पकडली. या कॅच नंतर मॅच बदलली पण एबी डिव्हिलिअर्सने टीमला जिंकवून दिलचं.