PBKG vs KKR: पहिल्याच सामन्यात 'पंजाबची बल्ले बल्ले'; कोलकाताला पाजलं पाणी!

IPL 2023,PBKG vs KKR: अखेरच्या 4 ओव्हर शिल्लक असताना पावसाने गोंधळ घातला. कोलकाताला जिंकण्यासाठी 24 बॉलमध्ये 46 धावांची गरज होती. त्यावेळी केकेआर डीएलएसच्या नियमांनुसार 7 धावांनी मागे होती. पंजाब किंग्ज 7 धावांनी विजयी नोंदवला आहे.

Updated: Apr 1, 2023, 08:02 PM IST
PBKG vs KKR: पहिल्याच सामन्यात 'पंजाबची बल्ले बल्ले'; कोलकाताला पाजलं पाणी! title=
ipl 2023,PBKG,KKR

Punjab Kings vs Kolkata Knight Riders:  मोहालीच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या आयपीएल (IPL 2023) सामन्यात पंजाब किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला आहे. रंगतदार झालेल्या या सामन्यात अखेर पंजाबने बाजी मारली. सामना रंगात आला असताना पावसाने गोंधळ घातला. पावसामुळे सामना पुन्हा सुरू झालाच नाही. केकेआर डीआरएसच्या नियमांनुसार 7 धावांनी मागे होती. पंजाब किंग्ज 7 धावांनी विजयी नोंदवला आहे. (Punjab Kings beat Kolkata Knight Riders in 2nd match of ipl 2023)

पंजाबची दमदार सुरूवात झाली. प्रभसिमरन सिंग (Prabhsimran Singh) प्रथम बाद झाल्यानंतर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि भानुका राजपक्षे (Bhanuka Rajapaksa) यांनी पंजाबची गाडी रुळावर आणली. पहिल्या 10 ओव्हरमध्ये 100 धावा झाल्या होत्या. त्यानंतर कोलकाताने वेळोवेळी विकेट काढल्या. अखेरच्या वेळी सॅम करनने (Sam Curran) सुत्र हातात घेतली आणि 17 बॉलमध्ये 26 धावा केल्या आणि पंजाबला 191 धावांवर पोहोचवलं.

पंजाबने दिलेल्या 192 धावांचा पाठलाग करताना कोलकाताची (KKR) सुरूवात काही खास झाली नाही. अर्शदीप सिंहने (Arshdeep Singh) सुरूवातीला दोन झटके दिले. त्यामुळे कोलकाताचा संघ बॅकफूटवर आला. त्यानंतर फिरकीपटूंनी जादू दाखवली. राझा आणि राहुल चहलने कोलकाताला आणखी दोन झटके दिले. 

आणखी वाचा - CSK vs GT: चेन्नईच्या पराभवाला धोनीच जबाबदार; 'या' तीन खेळाडूंनी ओढले ताशेरे!

कोलकाता सामना गमवेल अशी परिस्थिती असताना अँद्रे रसलने (Andre Russell) जिंकण्याच्या आशा कायम ठेवल्या होत्या. त्यानंतर सॅम करनने रसलची विकेट घेतली आणि सामना पलटवला. रसलने 19 बॉलमध्ये 35 रन्स केल्या. एम्पॅक्ट प्लेयर व्यंकटेश अय्यरने (Venkatesh Iyer) जलद धावा केला. मात्र, त्याला देखील सामना अखेरपर्यंत जेवून जाता आला नाही.

दरम्यान, पंजाबचे सॅम करन आणि शाहरूख खान मैदानात होते. अखेरच्या 4 ओव्हर शिल्लक असताना पावसाने गोंधळ घातला. कोलकाताला जिंकण्यासाठी 24 बॉलमध्ये 46 धावांची गरज होती. त्यावेळी केकेआर डीआरएसच्या नियमांनुसार 7 धावांनी मागे होती. मात्र, अखेर पावसामुळे सामना संपवावा लागला आणि डीआरएसच्या नियमांनुसार पंजाबला विजयी (KKR by 7 runs as per DRS Rule) घोषित करण्यात आलंय.