नेमकी चूक कोणाची? रोहित शर्मा की मोहम्मद नबी? आर आश्विन म्हणतो 'मला माफ करा पण...'

Ravi Ashwin Statement : संबंधित वादावर माझं वैयक्तिक मत आणि दृष्टीकोन आहे. या घटनेला दोन बाजू आहेत. जर आमच्या टीमचं नुकसान झालं असतं तर मला आणि आमच्या संघाला नक्कीच वाईट वाटलं असतं, असं आश्विनने म्हटलं आहे.

सौरभ तळेकर | Updated: Jan 19, 2024, 04:56 PM IST
नेमकी चूक कोणाची? रोहित शर्मा की मोहम्मद नबी? आर आश्विन म्हणतो 'मला माफ करा पण...' title=
R aswin statement on rohit sharma

Rohit Sharma vs Mohammad Nabi : भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात झालेल्या अखेरच्या आणि तिसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात रोमांचक गोष्टी घडल्या. चेन्नईत खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात 212 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या अफगाणिस्तान टीमला 6 गडी गमावून केवळ 212 धावा करता आल्या. मात्र सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर पहिली सुपर ओव्हर खेळवण्यात आली. ज्यामध्ये अफगाणिस्तानने 16 रन्स केल्या. या दरम्यान ओव्हर थ्रो झालेल्या शेवटच्या बॉलवर मोहम्मद नबीने (Mohammad Nabi) 3 रन्स धावून काढले. नबीने पायाला बॉल लागून गेल्यानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) थेट नाराजी व्यक्त केली होती. त्यावर आता मोठा वाद सुरू झाल्याचं पहायला मिळालं होतं. नबीने धाव घेणं योग्य होतं का? असा सवाल विचारला जातोय. त्यावर आता टीम इंडियाचा स्पिनर आर आश्विन (Ravi Ashwin Statement) याने रोखठोक मत मांडलंय.

काय म्हणाला आर आश्विन?

संबंधित वादावर माझं वैयक्तिक मत आणि दृष्टीकोन आहे. या घटनेला दोन बाजू आहेत. जर आमच्या टीमचं नुकसान झालं असतं तर मला आणि आमच्या संघाला नक्कीच वाईट वाटलं असतं. आम्ही तर त्यांच्या जागी असतो तर अशी चूक केली नसती.  एक भारतीय क्रिकेट फॅन असल्याने मी असे म्हणू शकतो की, जर उद्या वर्ल्ड कप नॉक आऊट सामन्यात अशी परिस्थिती उद्भवली. तुम्हाला एका बॉलवर 2 धावा हव्या आहेत आणि विकेटकिपरने बॉल थ्रो केल्यानंतर बॉल लागून दुसरीकडे गेला. तेव्हा तुम्ही काय कराल? आम्ही देखील त्या परिस्थितीत धाव घेऊ. अशा परिस्थितीत खेळाडू का धावणार नाही? असा सवाल आर आश्विन याने व्यक्त केला आहे.

कोच राहुल द्रविड म्हणतात...

जेव्हा बॉल नबीच्या पायाला लागला तेव्हा त्याने धाव घेऊन चूक केली. ही गोष्ट क्रिकेटच्या स्पिरिटच्या विरोधात आहे. रोहितनंतर विराटने देखील यावर नाराजी व्यक्त केली होती. अशातच कोट राहुल द्रविड यांनी यावर स्पष्ट मत मांडलंय. 'तो खेळाचा भाग आहे. जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या विरोधात जाते तेव्हा तुम्ही थोडे निराश होता. या परिस्थितीत तुम्ही धावा करू शकता असे मला वाटतं', असं स्पष्ट मत राहुल द्रविड यांनी व्यक्त केलंय.

दरम्यान, रोहित शर्मा याने नाराजी व्यक्त केल्यानंतर मोहम्मद नबी आणि रोहित यांच्यात बाचाबाची झाल्याचं पहायला मिळालं. त्यावेळी मैदानातील वातावरण देखील तापलं होतं. विराट कोहलीने देखील पायाने बॉल रोखून नबीच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली होती.