close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अमेरिकन ओपन्सच्या विजेतेपदावर नदालचा कब्जा

राफाएल नदालनं रशियाच्या पीटर अँडरसनवर 6-3,  6-3, 6-4 अशी मात करत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

Updated: Sep 11, 2017, 12:05 PM IST
अमेरिकन ओपन्सच्या विजेतेपदावर नदालचा कब्जा

न्यूयॉर्क : पुरुष एकेरीतील अव्वल टेनिसपटू राफाएल नदालची जादू टेनिस कोर्टावर पुन्हा एकदा पहायला मिळाली. रविवारी रात्री झालेल्या अमेरिकन ओपन्सच्या विजेतेपदावर नदालनं कब्जा मिळवला आहे.

राफाएल नदालनं रशियाच्या पीटर अँडरसनवर 6-3,  6-3, 6-4 अशी मात करत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

राफाएल नदालचे हे या स्पर्धेतील तिसरे आणि एकूण 16 वे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. नदालने याआधी 2010 आणि 2013 मध्ये या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. तसेच यावर्षी फ्रेंच ओपनच्या विजेतेपदावरही त्याने कब्जा केला होता.