Arjun Tendulkar Century : अर्जुन तेंडुलकरचा रणजी पदार्पणात मोठा धमाका, सचिनसारखा पराक्रम पुन्हा केला

Arjun Tendulkar :अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीच्या पदार्पणातच शानदार शतक झळकावले आहे. गोव्याकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने राजस्थानविरुद्ध ही अप्रतिम खेळी केली. यासह त्याने वडील सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.  

Updated: Dec 14, 2022, 03:04 PM IST
Arjun Tendulkar Century : अर्जुन तेंडुलकरचा रणजी पदार्पणात मोठा धमाका, सचिनसारखा पराक्रम पुन्हा केला  title=

Ranji Trophy : रणजी ट्रॉफीचा नवा हंगाम मंगळवारपासून सुरू झाला. माजी क्रिकेटपटू आणि मास्टर ब्लास्टर  सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकरने यंदा गोव्याच्या संघाकडून खेळत आहे.  दरम्यान, राजस्थानविरुद्ध सुरू असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अर्जुन तेंडुलकरने जबरदस्त कामगिरी करताना शतक पूर्ण केले. गोव्याकडून पदार्पण करताना अर्जुनने 179 चेंडूत शानदार शतक पुर्ण केले. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अर्जुन तेंडुलकरने शानदार फलंदाजी करत विरोधी संघाला रोखून धरले. अर्जुन तेंडुलकरने 178 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 2 षटकारांसह आपले शतक पूर्ण केले. सचिन तेंडुलकरनेही रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना 1988 मध्ये पदार्पणातच शकत ठोकले होते. आता या पराक्रमाची पुनरावृत्ती करण्याची संधी अर्जुन तेंडुलकरकडे आहे. (arjun tendulkar century on ranji trophy debut goa vs rajasthan sachin tendulkar son)

गोवा आणि राजस्थान यांच्यात गोव्यात खेळल्या जात असलेल्या या सामन्यात राजस्थानने प्रथम गोलंदाजी निवडली. 23 वर्षीय अर्जुन तेंडुलकरचा येथे प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला असून त्याने राजस्थानविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात स्फोटक फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले. तो सध्या मैदानात असून शतक पुर्ण केले. अर्जुनने आपल्या डावात एकूण 26 एकेरी, 7 दुहेरी धावा केल्या. सुमारे 56 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आणि त्याच्या डावात 131 डॉट बॉल देखील खेळले. अर्जुनने राजस्थानच्या जवळपास प्रत्येक गोलंदाजावर हल्ला करत शतक झळकावले.

वाचा:  टीम इंडियाच्या प्रशिक्षकाने ऋषभ पंतबाबत केला ‘हा’ मोठा खुलासा, त्याला कधीच...

सचिन तेंडुलकरने 1988 मध्ये गुजरातविरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. मुंबईकडून खेळताना सचिनने पहिल्याच डावात शतक केलं होतं. तेव्हा सचिन फक्त 15 वर्षांचा होता. रणजी ट्रॉफीत पदार्पण करणारा तो सर्वात तरुण खेळाडू होता. सचिनने 129 चेंडूत शतक झळकावलं होतं. त्यानं नाबाद 100 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. तो सामना अनिर्णित राहिला होता.