VIDEO: भारताच्या विजयाचं बिअर पिऊन सेलिब्रेशन, रवी शास्त्री ट्रोल

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा तब्बल १३७ रननी विजय झाला आहे.

Updated: Dec 31, 2018, 09:21 PM IST
VIDEO: भारताच्या विजयाचं बिअर पिऊन सेलिब्रेशन, रवी शास्त्री ट्रोल title=

मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा तब्बल १३७ रननी विजय झाला आहे. या विजयाबरोबरच भारतानं ४ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये २-१नं आघाडी घेतली आहे. रविवारी ४.३ ओव्हरमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाच्या उरलेल्या २ विकेट घेतल्या आणि मॅच खिशात टाकली. या विजयानंतर भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी बिअर पिऊन सेलिब्रेशन केलं. पण यानंतर रवी शास्त्री सोशल नेटवर्किंगवर ट्रोल होताना दिसत आहेत.

मेलबर्नमधल्या विजयानंतर भारतीय टीम स्टेडियममधून हॉटेलमध्ये परतत होती. यावेळी रवी शास्त्री बसमधून उतरले. बसमधून उतरत असताना रवी शास्त्रींनी बिअरची बाटली तोंडाला लावली.

बसमधून भारतीय टीम उतरत असताना हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या भारतीय क्रिकेट रसिकांनीही जल्लोषात भारतीय टीमचं स्वागत केलं. भारत आर्मीनं हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना अनेकांनी रवी शास्त्रींना ट्रोल केलं आहे. 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x