मुंबई : टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2022) टीम इंडियाचं आव्हान सेमी फायनलमध्ये संपुष्ठात आले होते. इंग्लंडने 10 गडी राखून टीम इंडियाचा (Team India) मोठा पराभव केला होता. नंतर इंग्लंडने फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव करत वर्ल्ड कपवर नाव कोरले. या वर्ल्ड कपनंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघावर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र आता टीम इंडियाचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) वर्ल्ड कपमधील पराभवानंतर मोठे वक्तव्य केले आहे.
रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) म्हणाला की, मी समजू शकतो की आमचे चाहते खूप निराश झाले आहेत, आम्ही या पराभवासाठी कोणतेही कारण देऊ शकत नाही. तो पुढे म्हणतो की, भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही आणि विश्वचषक जिंकू शकला नाही, असे सर्वांना वाटते.
मी चाहत्यांच्या भावनांचा आदर करतो. कोणतेही कारण देऊन चाहत्यांच्या जखमा भरून काढता येणार नाहीत. आमच्यासाठी हा अत्यंत निराशाजनक क्षण होता, परंतु आम्हाला आता यातून पुढे जावे लागेल,असे त्याने म्हटले आहे.
भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला, ही एखाद्या कामगिरीपेक्षा कमी नाही, असे देखील अश्विनने (Ravichandran Ashwin) म्हटले आहे.सेमी फायनलमध्ये पराभव पत्करावा लागल्याने केवळ चाहतेच नाही तर भारतीय संघाचे खेळाडूही निराश झाल्याचे त्याने पुढे मान्य केले आहे.
स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये आमचा संघ पराभूत झाला, इथपर्यंत पोहोचणे सोपे काम नाही, उपांत्य फेरी गाठणे ही एक कामगिरी मानली पाहिजे. पण चाहत्यांच्या दृष्टिकोनातून हे खूप निराशाजनक आहे, कारण आमच्या चाहत्यांना संघाचा विजय पाहायचा होता,असेही त्याने म्हटले आहे. अश्विनच्या (Ravichandran Ashwin) या विधानाची आता चर्चा रंगली आहे.