कॅप्टन रविंद्र जडेजाचं 'गन सेलिब्रेशन' व्हायरल, पाहा व्हिडीओ

सर जडेजाचं मैदानात अनोखं गन सेलिब्रेशन, या सेलिब्रेशनमागे विजय नाही तर 'हे' मोठं कारण

Updated: Apr 13, 2022, 08:12 AM IST
कॅप्टन रविंद्र जडेजाचं 'गन सेलिब्रेशन' व्हायरल, पाहा व्हिडीओ   title=

मुंबई : चेन्नई विरुद्ध बंगळुरू मंगळवारी अटीतटीचा सामना झाला. 4 वेळा पराभूत झालेल्या चेन्नईनं बंगळुरूवर 23 धावांनी विजय मिळवला. आयपीएलमध्ये अखेर विजयाचं खातं उघडण्यात चेन्नईला अखेर यश मिळालं. 5 पैकी 4 सामने गमवले तर बंगळुरू विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवता आला. 

चेन्नईने 20 ओव्हरमध्ये बंगळुरूसमोर 216 धावांचा डोंगर उभा केला. बंगळुरू टीमसमोर विजयासाठी मोठं आव्हान होतं. 20 ओव्हरमध्ये RCB ला 193 धावांवर रोखण्यात चेन्नईला यश आलं. 23 धावांनी CSK ने यंदाच्या हंगामातला पहिला विजय आपल्या नावावर केला. 

रविंद्र जडेजाचं या मॅचदरम्यान गन सेलिब्रेशन व्हायरल झालं आहे. अशा हटके पद्धतीनं सेलिब्रेशन करण्याची त्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी पुष्पा स्टाईल असो किंवा 4 स्टाईल सेलिब्रेशन मैदानात गाजले आहेत. 

या सामन्यादरम्यान चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) कर्णधार रवींद्र जडेजाचा एक नवीन सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. रवींद्र जडेजाने बंगळुरूचा घातक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलला आऊट केलं. मॅक्सवेल क्लीन बोल्ड होताच जडेजानं गन सेलिब्रेशन केलं.

जडेजाचं हे युनिक सेलिब्रेशन सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं आहे. त्याने 4 ओव्हरमध्ये 39 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या. सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या चर्चेत आहेत. 

सलग चार पराभवानंतर पहिल्यांदा जडेजानं विजय मिळवला आहे. बंगळुरूचा 23 धावांनी पराभव करून हा विजय मिळवला. उथप्पाने 88 तर शिवम दुबेनं 95 धावांची खेळी केली. 2022 च्या आयपीएलमध्ये चेन्नईनं पहिल्या विजयाची नोंद केली आहे.