जडेजावरही चढला पुष्पाचा 'Fever', शेअर केला जबरदस्त व्हिडीओ

आता जडेजाने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. 

Updated: Jan 13, 2022, 08:15 PM IST
जडेजावरही चढला पुष्पाचा 'Fever', शेअर केला जबरदस्त व्हिडीओ title=

मुंबई:   पुष्पा पार्ट 1 सिनेमानं छप्पर फाड के अशी बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. पुष्पाचे डायलॉग आणि गाणी अक्षरश: चाहत्यांनी डोक्यावर घेतली आहेत. अनेकांची रिंगटोन चेंज झाली आहे. कलाकार पुष्पामधील गाण्यांवर रिल्स करताना सोशल मीडियावर दिसत आहेत. आता जडेजालाही पुष्पाचा लूक करण्याचा मोह आवरला नाही. 

भारताचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जडेजा त्याच्या धडाकेबाज फलंदाजी आणि किलर बॉलिंगसाठी ओळखला जातो. जडेजाने भारतीय संघासाठी अनेक सामने प्रतिस्पर्ध्याच्या हातून खेचून आणले. 

जडेजा जेव्हा अर्धशतक किंवा शतक ठोकतो तेव्हा तो तलवार फिरवून राजपूत शैलीत उत्सव साजरा करतो. जडेजा आपल्या लूक आणि स्टाइलमुळे सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असतो. घोडेस्वारी आणि तलवारबाजीची त्याला आवडते हे सर्वांनाच माहिती आहे. 

आता जडेजाने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो पुष्पासारखा लूक केल्याचं दिसत आहे. 

पुष्पा प्रमाणे अभिनय करून डायलॉग म्हटले आहेत. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये तंबाखूचे सेवन करू नये, तंबाखू आणि सिगारेट न पिण्याचा सल्ला दिला आहे.