मुंबई : कोलकाता विरुद्ध झालेल्या सामन्यात बंगळुरू संघाला विजय मिळवण्यात यश आलं आहे. बंगळुरूला दुसरा सामना जिंकता आला. तर कोलकाता टीमचा दुसऱ्या सामन्यात पराभव झाला. 19 व्या ओव्हरमध्ये कोलकाता संघाचं फिल्डिंग कमी पडलं आणि त्याचा फायदा बंगळुरूने उचलला आणि सामन्यात विजय मिळवला.
बंगळुरू टीमने शेवटच्या ओव्हरमध्ये एक चौकार आणि षटकार ठोकून टीमला विजय मिळवून दिला. ही कामगिरी दिनेश कार्तिकने केली. बंगळुरूने 3 विकेट्सने कोलकाता टीमला पराभूत करत पॉईंट टेबलमध्ये आपलं खातं उघडलं.
कोलकाता संघाने 128 धावा केल्या होत्या. त्यानंतर हे लक्ष्य बंगळुरू टीमने 7 विकेट्स गमावून 132 करत पूर्ण केलं आणि कोलकाता टीमवर विजय मिळवला आहे.
शेवटच्या ओव्हरमध्ये बंगळुरू संघाला विजयासाठी 7 धावांची आवश्यकता होती. दिनेश कार्तिकने यावेळी आंद्रे रसेलच्या पहिल्या बॉलवर षटकार ठोकला, त्यानंतर दुसऱ्या बॉलवर चौकार मारला. दिनेश कार्तिने 2 बॉलमध्ये 10 धावांनी बंगळुरूला विजय मिळवून दिला. त्याच्या या जबरदस्त कामगिरीचं कौतुक फाफ डु प्लेसीसने केलं.
RCB चा कर्णधार फाफ ड्यु प्लेसीसने दिनेश कार्तिकची तुलना महेंद्रसिंह धोनीशी केली. तो धोनीसारखाच कूल असल्याचं यावेळी त्याने बोलताना म्हटलं. त्याने म्हटलं की दिनेश कार्तिकचा अनुभव आम्हाला कमी आला आहे.
'कमी वेळेत छोट्या स्कोअरचं लक्ष्य पूर्ण करणं सोपी गोष्ट नाही कारण त्यामध्ये मोठी रिस्क असते. अशावेळी तुम्हाला कायम सकारात्मक राहावं लागतं. तुम्ही सामना लवकर सोडूही शकत नाही. दिनेश कार्तिकने उत्तम कामगिरी केली' असं म्हणत फाफने त्याचं खूप कौतुक केलं.