मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामाची सुरुवात चुरशीची झाली. बंगळुरू विरुद्ध मुंबई सामना नुकताच रंगला. मुंबई टीमचा पुन्हा एकदा पराभव झाला. एक मोठी बातमी याच दरम्यानची येत आहे. स्टार खेळाडूच्या बहिणीचं निधन झालं. सामना संपल्यानंतर खेळाडू तातडीनं घरी गेला.
मुंबई विरुद्ध जिंकल्याचा आनंदही त्याला सेलिब्रेट करता आला नाही. त्याआधीच बहिणीच्या निधनाची बातमी आल्याने तो सामना संपल्यानंतर तातडीनं घरी परतला. मिळालेल्या माहितीनुसार या खेळाडूची बहीण आजारी होती.
शनिवारी डबल हेडर सामन्यात संध्याकाळी बंगळुरू विरुद्ध मुंबई सामना रंगला. या सामन्यात वेगवान गोलंदाज हर्षल पटेलच्या बहिणीचं निधन झाल्याची बातमी आली. यावेळी हर्षसोबत त्याची टीम आणि मॅनेजमेंट पाठीशी उभं राहिलं.
मॅनेजमेंटने तातडीनं त्याची घरी जाण्याची व्यवस्थाही केली. हर्षल पटेलला पुन्हा आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी बायोबबल आणि क्वारंटाइनच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे.