RCB vs PBKS, IPL 2024 : पंजाबविरुद्ध नॉक आऊट सामन्यात कोहलीच्या आरसीबीने दमदार विजय मिळवला. पंजाबचा पराभव (RCB vs PBKS) करत आयपीएल हंगामातील 5 वा विजय मिळवला आहे. बंगळुरूने पंजाब किंग्जचा 60 धावांनी विजय मिळवला. तर दुसरीकडे पंजाब किंग्ज प्लेऑफमधून (IPL 2024 Playoffs) बाहेर पडली आहे. आरसीबीने सलग 4 था विजय मिळवला असल्याने अजूनही आरसीबी प्लेऑफच्या रेसमध्ये (RCB Playoffs scenario) कायम आहे. पाईटंस टेबलमध्ये आरसीबीचा संघ थेट सातव्या स्थानी पोहोचला आहे. तर बंगळुरूचा नेट रनरेट देखील मोठ्या प्रमाणात सुधारलाय. आरसीबीचा आधी नेट रननेट -0.049 होता आता आरसीबीचा नेट रननेट 0.22 झाला आहे. त्यामुळे आता आरसीबीने मागून येऊन सर्वांना धक्का दिलाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
आरसीबीसाठी प्लेऑफचं गणित कसं असेल? (RCB Playoffs qualification scenario)
आरसीबीने आत्तापर्यंत 12 सामने खेळले आहेत. त्यात आरसीबीने 5 विजय मिळवले आहेत. तर 7 सामन्यात त्यांना पराभवाचं तोंड पहावं लागलंय. आरसीबीला आता प्लेऑफमध्ये पोहोचायचं असेल तर उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवावाच लागेल. आरसीबीचा आगामी सामना दिल्ली आणि चेन्नई यांच्याविरुद्ध असणार आहे. त्यामुळे जर आरसीबी दोन्ही सामने जिंकली तर आरसीबीसाठी प्लेऑफ सोपं जाईल. तसेच आरसीबीला चेन्नई आणि लखनऊच्या पराभवाची वाट देखील पहावी लागणार आहे. गुजरात आणि राजस्थानला चेन्नईला हरवावं लागेल.
जर चेन्नई त्यांचे आगामी 3 पैकी 2 सामने हारले तरच आरसीबी पुढील पायरी चढू शकेल. एवढंच नाही तर लखनऊला देखील त्यांचे आगामी दोन सामन्यांपैकी एक सामना हरावा लागेल. मुंबईला लखनऊचा पराभव करावा लागेल. तर कोलकाता किंवा हैदराबादला गुजरातचा पराभव करावा लागेल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, महिपाल लोमरोर, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटीकपर), स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज आणि लॉकी फर्ग्युसन.
पंजाब किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : सॅम करन (कॅप्टन), जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, रायली रोसो, शशांक सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, आशुतोष शर्मा, हर्षल पटेल, राहुल चहर, अर्शदीप सिंग आणि विद्वत कवेरप्पा.