RCB vs RR : दिनेश कार्तिक Out की Not Out? अंपायरच्या निर्णयाने पेटला वाद, Video पाहून तुम्हीच सांगा

Dinesh Kartik Controversial Decision : राजस्थान आणि आरसीबी यांच्यातील (RCB vs RR Eliminator) सामन्यात दिनेश कार्तिकला नाबाद दिल्यानंतर आता थर्ड अंपायरच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय.

सौरभ तळेकर | Updated: May 22, 2024, 09:58 PM IST
RCB vs RR : दिनेश कार्तिक Out की Not Out? अंपायरच्या निर्णयाने पेटला वाद, Video पाहून तुम्हीच सांगा title=
Dinesh Karthik Out or Not Out Controversy decision by third umpire

RCB vs RR Eliminator : आयपीएल 2024 च्या सर्वात रोमांचक अशा एलिमिनेटर सामन्यात राजस्थान आणि आरसीबी (RCB vs RR) यांच्यात फाईल पहायला मिळत आहे. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 173 धावा उभ्या केल्या. फिरकीच्या जोरावर राजस्थानने आरसीबीचा धावणारा स्कोरबोर्ड थांबवला अन् आरसीबीच्या धावगतीला आवर घातला. मात्र, अखेर फिनिशर दिनेश कार्तिकने (Dinesh Kartik) आक्रमक फलंदाजी करण्याची गरज होती. मात्र, त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत. अशातच आता दिनेश कार्तिकला दिलेल्या थर्ड अंपायरच्या (Third Umpire) निर्णयामुळे आता वाद निर्माण झाला. थर्ड अंपायरने बाद असताना देखील डीकेला नाबाद जाहीर केलं.

नेमकं काय झालं?

आरसीबीकडून एकामागोमाग विकेट पडल्यानंतर दिनेश कार्तिक मैदानात उतरला. आवेश खानच्या षटकात कार्तिकने स्वत:चा बचाव करण्यासाठी एक बॉल टोलवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बॉल त्याच्या पॅडला लागला. ग्राऊंडवर अंपायरने बाद जाहीर केल्यानंतर डीकेने रिव्ह्यू घेतला. थर्ड अंपायरने स्पष्ट आऊट दिसत असताना त्याला नाबाद दिलं. बॉल बॅटला कट लागल्याचं थर्ड अंपायरचं म्हणणं होतं. या निर्णयानंतर समालोचकांनी थर्ड अंपायरवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. अंपायरचा निर्णय पाहून आरआरचा मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा तिसऱ्या पंचांना भेटायला अन् नाराजी व्यक्त केली.

पाहा Video

दरम्यान, एलिमिनेटरमध्ये बेंगळुरूने राजस्थानसमोर 173 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 20 षटकांत 8 गडी गमावून 172 धावा केल्या. रजत पाटीदारने सर्वाधिक 34 धावा केल्या, तर विराट कोहलीने 33 आणि महिपाल लोमरने 32 धावा केल्या. तर राजस्थानकडून आवेश खानने सर्वाधिक तीन बळी घेतले. त्याचवेळी अश्विनला दोन विकेट मिळाल्या. ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा आणि चहल यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार ), रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, यश दयाल, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन.