'कुंबळेला विरोध करणाऱ्यांना टीम बाहेर काढा'

अनिल कुंबळेला भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यायला लागल्यामुळे क्रिकेट वर्तुळात चांगलाच गदारोळ उडाला आहे.

Updated: Jun 21, 2017, 04:20 PM IST
'कुंबळेला विरोध करणाऱ्यांना टीम बाहेर काढा' title=

मुंबई : अनिल कुंबळेला भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यायला लागल्यामुळे क्रिकेट वर्तुळात चांगलाच गदारोळ उडाला आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी या मुद्द्यावरून विराट कोहलीवर निशाणा साधला आहे.

बरं वाटत नसेल तर सुट्टी घ्या आणि शॉपिंगला जा, असं सांगणारा प्रशिक्षक तुम्हाला हवा आहे का असा सवाल गावसकर यांनी विचारला आहे. तसंच कुंबळेच्या कठोर वागण्यावर ज्यांना समस्या आहे त्यांना टीममधून बाहेर काढा असंही गावसकर म्हणाले आहेत.

कुंबळे प्रशिक्षक झाल्यापासून भारताची कामगिरी सर्वोत्तम झाली आहे. भारतात झालेल्या १३ टेस्टपैकी आपण १० टेस्ट जिंकलो तर एका टेस्टमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तर वेस्ट इंडिजमध्येही आपण टेस्ट सीरिज जिंकलो. कुंबळेची कामगिरी एवढी चांगली असताना त्याला राजीनामा द्यायला लागणं हा भारतीय क्रिकेटसाठी वाईट दिवस असल्याची प्रतिक्रिया गावसकर यांनी दिली आहे.