Richest Players List : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा (Virat Kohli) गणना जगभरातील सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीत होते. क्रिकेटर्सविषयी बोलायचं झालं तर विराट हा सध्याचा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे. त्याच्या एकूण संपत्तीच्या आसपासही कोणी नाही. क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाबाहेरही विराट कोहलीची कमाई सर्वाधिक आहे. आता पुन्हा एकदा हे सिद्ध झालं आहे. गेल्या 12 महिन्यात जगभरातील खेळाडूंमध्ये विराट कोहली सर्वात श्रीमंत खेळाडू ठरलाय. स्टॅटिस्टाच्या रिपोर्टनुसार गेल्या वर्षभरात विराट कोहलीने तब्बल 847 रुपयांची कमाई केली आहे. जगभरातील टॉप-10 श्रीमंत खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचा समावेश झाला आहे.
टॉप-10 मध्ये एकमेव क्रिकेटर
टीम इंडियाच्या टी20 विजयात मोलाची भूमिका बजावणारा स्टार फलंदाज विराट कोहली कमाईच्या बाबतीत सर्वात अव्वल आहे. स्टॅटिस्टा या खेळाडूंच्या संपत्तीची नोंद ठेवणाऱ्या संस्थेने जाहीर केलेल्या ताज्या रिपोर्टमध्ये गेल्या 12 महिन्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत टॉप-10 मध्ये विराट कोहली हा एकमेव क्रिकेटर आहे. या यादीत 1 सप्टेंबर 2023 ते 1 सप्टेंबर 2024 दरम्यानच्या उत्पन्नाचा समावेश करण्यात आला आहे. यात सर्वाधिक फुटबॉल आणि बास्केटबॉलपटूंचा समावेश आहे. या यादीत सर्वात अव्वल स्थानावर स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आहे. गेल्या वर्षभरात रोनाल्डोने तब्बल 2081 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
कोहलीची एकूण संपत्ती
विराट कोहीलच्या कमाईची अनेक स्त्रोत आहेत. विराट बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रेक्टच्या टॉप ग्रेडमध्ये आहे, बीसीसीआयकडून त्याला वर्षाला 7 कोटी रुपये दिले जातात. याशिवाय वर्षभरात खेळल्या जाणाऱ्या कसोटी, एकदिवसीय आणि टी20 सामन्यातून त्याची दीड ते दोन कोटी रुपयांची कमाई होते. याशिवाय आयपीएल फ्रँचाईज रॉयल चॅलेंजर्स त्याला वर्षाला 15 कोटी रुपये देते. क्रिकेट मैदानाबाहेरही विराट कोट्यवधी कमावतो. जाहाराती आणि ब्रँड एन्डोर्समेंटच्या माध्यमातूनही त्याची तगडी कमाई होते.
विराट MRF, PUMA, AUDI, HSBC, PHILIPS, अमेरिकन टूरिस्टर यासह अनेक कंपन्यांचा ब्रँड आहे. इतकंच नाही तर डिजिट इंडिया, वन एट कम्यून, रॉन्ग या कंपन्यांमध्येही विराट कोहलीची गुंतवणूक आहे. गेल्या आर्थिक वर्षात विराट कोहलीने 66 कोटी रुपयांचा आयकर भरल्याचं नुकतंच समोर आलं आहे. भारतीय खेळाडूंमध्ये हा सर्वाधिक कर आहे. 35 व्या वर्षी टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या विराट कोहलीच्या कमाई आणि ब्रँड व्हॅल्यूत जराही कमी झालेली नाही.
सर्वाधिक कमाई करणारे टॉप-10 खेळाडू
ख्रिस्तियानो रोनाल्डो (फुटबॉल)- 2081 कोटी जॉन रॉड्रिगेज (गोल्फ)- 1712 कोटी लियोनल मेसी (फुटबॉल)- 1074 कोटी लेब्रॉन जेम्स (बास्केटबॉल)- 990 कोटी कीलियन एमबाप्पे (फुटबॉल)- 881 कोटी जियानिस एंटेटोकोउनम्पो (बास्केटबॉल)- कोटी नेमार ज्युनियर (फुटबॉल)- 864 कोटी करीम बेंजेमा (फुटबॉल)- 864 कोटी विराट कोहली (क्रिकेट)- 847 कोटी स्टीफन करी (बास्केटबॉल)- 831कोटी