Rinku Singh On His Low KKR Salary: इंडियन प्रिमिअर लीगच्या 2024 च्या पर्वाचं जेतेपद जिंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सच्या संघातील स्फोटक फलंदाज रिंकू सिंह हा मागील 7 वर्षांपासू इंडियन प्रिमिअर लीगमध्ये खेळतोय. मात्र मागील काही पर्वांपासून रिंकूचा या स्पर्धेत चांगलाच बोलबाला आहे. रिंकून कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला आपल्या कौशल्याच्या जोरावर अनेक रोमहर्षक सामने जिंकून दिले आहेत. केकेआरसाठी केलेल्या कामगिरीच्या जोरावरच रिंकूला भारतीय संघात स्थान मिळालं. रिंकूला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघात राखीव खेळाडू म्हणून स्थान मिळालं आहे. रिंकू मधल्या फळीत येऊन संघाला विजय मिळवून देत उत्तम फिनीशरची भूमिका बजावत असल्याने त्याची तुलना अगदी महेंद्रसिंह धोनीबरोबरही झालेली आहे. असं असतानाही रिंकूला आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळताना कामगिरीला साजेसं मानधन दिलं जात नाही, अशी चर्चा त्याच्या चाहत्यांमध्ये आहे. केकेआरचा संघ रिंकूला केवळ 55 लाख रुपये मानधन देतो. दुसरीकडे त्याचाच सहकारी अशलेला मिचेल स्टार्कसाठी मात्र केकेआरने 24.75 कोटी रुपये मोजले आहेत.
रिंकू केकेआरपासून वेगळा झाला आणि आयपीएलच्या लिलावामध्ये उतरला तर त्याला 10 कोटींहून अधिकची बोली सहज मिळेल अशी त्याची कामगिरी आहे. केकेआरमध्ये राहून तुला कामगिरीला साजेसं मानधन दिलं जात नसल्याबद्दल प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना रिंकूने मानसिकतेचा उल्लेख केला आहे. रिंकूने आपल्यासाठी 50 ते 55 लाख रुपये सुद्धा फार मोठी आहे, असं म्हटलंय. रिंकू हा पैशांमागे धावणाऱ्या खेळाडूंपैकी नक्कीच नाही. पैसा काय येतो आणि जातो त्यामुळेच आपण आपलं मूळ सोडायला नको असंही रिंकू सांगतो.
"मला 50 ते 55 लाखही फार झाले. मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी इतकी कमाई करेन असंही मला वाटलं नव्हतं. मी तेव्हा लहान असल्याने मला अगदी 10 ते 5 रुपये मिळाले तरी आनंद व्हायचा. मी या क्षेत्रात काही तरी करुन पैसा कमवेल असं वाटलं होतं. मला आता 55 लाख मिळतात. ते मी विचार केलेला त्यापेक्षा फारच जास्त आहेत. देवाने मला जे काही दिलं आहे त्याबद्दल मी समाधानी असलं पाहिजे. मी हा असा सरळ विचार करतो. मला अमुक एवढेच पैसे मिळाले पाहिजेत वगैरे, असा विचार मी करत नाही. मी 55 लाखांच्या मानधानामध्ये समाधानी आहे. माझ्याकडे हे नव्हते तेव्हाच मला पैशाची किंमत कळली, " असं रिंकूने 'दैनिक जागरण'शी बोलताना सांगितलं.
नक्की वाचा >> रितिकाच्या Insta स्टोरीवरुन तुफान राडा! रोहितच्या बायकोनं डिलीट केली पोस्ट; चाहते म्हणाले, 'हिंदूंवर..'
"मी आज तुम्हाला सत्य सांगायला गेलो तर हे सारं भ्रम आहे. तुम्ही तुमच्यासोबत काहीही घेऊन आलेला नाहीत. तुम्ही स्वत:बरोबर काहीही घेऊन जाणार नाही. वेळ कधी बदलेल तुम्हाला सांगता येणार नाही. तुम्ही जसे आला आहात तसेच तुम्हाला परत जावे लागेल, असं मला म्हणाचं आहे. त्यामुळेच मूळ धरुन राहा, एवढंच मी सांगेन," असंही रिंकू म्हणाला.