Rishabh Pant : तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं...; अपघातानंतर पहिल्यांदाच मैदानावर आलेल्या पंतची तुफान फटकेबाजी.. Video

Rishabh Pant : अपघातानंतर ऋषभ पंत ( Rishabh Pant ) क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. तब्बल 8 महिन्यानंतर दुखापतीतून रिकव्हर झाल्यानंतर पंतची फटेकेबाजी पाहून सर्व चाहते हैराण झाले आहेत. 

सुरभि जगदीश | Updated: Aug 16, 2023, 05:57 PM IST
Rishabh Pant : तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं...; अपघातानंतर पहिल्यांदाच मैदानावर आलेल्या पंतची तुफान फटकेबाजी.. Video title=

Rishabh Pant : टीम इंडियाचा ( Team India ) विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतचा गेल्या डिसेंबर महिन्यात मोठा अपघात झाला होता. या अपघातानंतर ऋषभ पंत ( Rishabh Pant ) क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. मात्र नुकताच पंतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पंत तुफान फलंदाजी करताना दिसतोय. तब्बल 8 महिन्यानंतर दुखापतीतून रिकव्हर झाल्यानंतर पंतची फटेकेबाजी पाहून सर्व चाहते हैराण झाले आहेत. 

ऋषभ पंत ( Rishabh Pant ) सध्या नॅशनल अकॅडमीमध्ये रिहॅबिलीटेशन करतोय. यावेळी रिकव्हरीसोबत त्याने फलंदाजी करणंही सुरु केलं आहे. यावेळी सोशल मीडियावर ( Social Media ) त्याचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. 33 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये पंत एका प्रॅक्टिस सामन्यात फलंदाजी करत असून उत्तम पद्धतीने फोर आणि सिक्स लगावताना दिसतोय. 

पंतच्या तुफान फलंदाजीचा व्हिडीओ व्हायरल

पंत ( Rishabh Pant ) चा हा 33 सेकंदांचा व्हिडिओ सध्या फॅन्सना प्रचंड आवडतोय. पंतच्या या व्हिडीओनंतर तो लवकरच टीम इंडियामध्ये कमबॅक करेल अशी आशा व्यक्त करण्यात येतेय. आगामी आयसीसी वर्ल्डकपपर्यंत ( ICC ODI World cup ) पंतचं फीट होणं कठीण आहे. मात्र पुढच्या वर्षी इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या सिरीजमध्ये पंतच्या नावाचा विचार केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. 

अपघातानंतर पहिल्यांदा केली फलंदाजी

ऋषभ पंत ( Rishabh Pant ) चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. त्या व्हिडिओमध्ये पंत फलंदाजी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पंत ( Rishabh Pant ) यांच्या अपघातानंतर पहिल्यांदा फलंदाजीला उतरला असल्याचा दावा करण्यात येतोय. दरम्यान या व्हायरल झालेल्या व्हिडीओची झी 24 तासने खातरजमा केलेली नाही. 

कधी होणार पंतचं कमबॅक

दरम्यान पंतची ही तुफान फटकेबाजी पाहून पंत टीम इंडियामध्ये कधी कमबॅक करणार हा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय. हाती आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋषभ पंत 2024 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टेस्ट सिरीजमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक येऊ शकतो. 2022 मध्ये अपघातामुळे पंत ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, आयपीएल 2023, ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनललाही मुकला होता.