सिडनी : भारतासाठी आज एक धमाकेदार खेळी केल्यानंतर ऋषभ पंतने आपल्य़ा आईला ट्विट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने म्हटलं की, ती तूच आहेस जिने माझ्या सुरुवातीच्या वेळेतही मला साथ दिली. तू माझ्यासाठी जे काही केलं त्यासाठी मी तुला धन्यवाद देतो. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी आता तुला कसं धन्यवाद म्हणू यासाठी माझाकडे शब्द नाही आहेत.'
ऋषभ पंतला वडील नाही आहेत. त्याच्या कुटुंबात त्यासोबत त्याची आई आणि बहिण आहे. ऋषभ पंत चेतेश्वर पुजारानंतर या सिरीजमध्ये सर्वाधिक रन करणारा खेळाडू बनला आहे. पंत विराट कोहलीच्या देखील पुढे गेला आहे. पंतला मोठी खेळी करण्यात यश मिळत नव्हतं. पण आपल्या चुका सुधारत त्याने आज चांगली कामगिरी केली. यानंतर त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव सुरु झाला आहे.
इंग्लंड दौऱ्यात त्याने टेस्टमध्ये डेब्यू केलं होतं. १९ वर्षाच्या विकेटकीपर रिषभ पंतने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धमाकेदार सुरुवात केली आहे. धोनीनंतर कोण या प्रश्नाला कदाचित त्याने उत्तर दिलं आहे.