IPL 2023 : 'दादा' ईज बॅक, IPL मध्ये गांगुलीवर आता ही मोठी जबाबदारी

दादा पुन्हा क्रिकेटच्या मैदानात, IPL मध्ये या संघासोबत जोडला जाणार!

Updated: Jan 4, 2023, 10:53 AM IST
IPL 2023 : 'दादा' ईज बॅक, IPL मध्ये गांगुलीवर आता ही मोठी जबाबदारी title=

Sourav Ganguly in Delhi Capital : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुलीकडे इंडियन प्रीमियर लीगच्या दिल्ली कॅपिल्स संघाच्या क्रिकेट संचालक पदी नियुक्त करण्यात आलीय. बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन पायउतार झाल्यानंतर गांगुलीकडे क्रिकेटशी संबंधित मोठ्या पदावर परतण्याची ही पहिलीच वेळ आहे. (IPL 2023 Update Sourav Ganguly joining delhi capitals director of cricket IPL latets marathi news)

सौरव गांगुलीने याआधी 2019 साली आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे मेंटोर म्हणून काम पाहिलं आहे. सौरव गांगुलीने ऑक्टोबर 2022 मध्ये बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडले कारण त्याला दुसऱ्या टर्मसाठी वेळ वाढवून मिळाला नाही. गांगुलीने जवळपास तीन वर्षे बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची भूमिका पार पाडली. गांगुली आता आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्ससोबत नव्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगही प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडताना दिसणार आहे. 

दिल्ली संघाचा कर्णधार ऋषभ पंतचा (Rishabh Pant) अपघात झाल्याने यंदाची आयपीएल तो खेळेल की नाही याबाबत शंका आहे. पंतला दुखापतीतून रिकव्हर व्हायला बराच वेळ लागणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये पंतच्या अनुपस्थितीमध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघ व्यवस्थापन कर्णधारपदाची जबाबदारी कोणाकडे देणार याबाबत क्रीडा वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघ आयपीएलमधील असा संघ आहे ज्याने अजून एकही विजेतेपद पटकावलं नाही. ऋषभ पंत दिल्ली संघाचे कर्णधारपद सांभाळत होता. अपघातामुळे आता दिल्ली नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. यासाठी दोन खेळाडूंची नावे चर्चेत आहेत. ऑस्ट्रेलियन दिग्गज डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांच्यापैकी एकाकडे जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. 

दिल्ली कॅपिटल्स (DC)
ऋषभ पंत (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, रोमेन पॉवेल, अक्षर पटेल, कमलेश नागरकोटी, ललित यादव, मिचेल मार्श, प्रवीण दुबे, रिपल पटेल, सरफराज खान, विकी ओस्तवाल, यश धुल, अमन खान, एनरिक नोर्किया, चेतन साकारिया , कुलदीप यादव, लुंगी एनगिडी, मुस्तफिजुर रहमान, खलील अहमद, फिल सॉल्ट, इशांत शर्मा, मुकेश कुमार, मनीष पांडे आणि रिले रोसो.