close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सेमीफायनलमधील पराभवानंतर जडेजा दु:खी, पत्नीचा खुलासा

जडेजाच्या पत्नीचा एका मुलाखतीत खुलासा

Updated: Jul 15, 2019, 03:09 PM IST
सेमीफायनलमधील पराभवानंतर जडेजा दु:खी, पत्नीचा खुलासा

मॅँचेस्टर : टीम इंडियाचा सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध १८ धावांनी पराभव झाला. रविंद्र जडेजाने टीम इंडियाला विजय मिळवून देण्यासाठी ७७ रनची झुंजार खेळी केली. पण त्याचे प्रयत्न अपूरे पडले. या सेमीफायनमधील पराभवानंतर जडेजा फार दु:खी आहे. असा खुलासा त्याची पत्नी रिवाबाने केला आहे.  

'जडेजा पराभवानंतर फार दुखी होता आणि वारंवार म्हणत होता, मी आऊट नसतो झालो तर आम्ही जिंकलो असतो. विजयाच्या जवळ आल्यानंतर पराभूत होणं, हे फार वेदनादायक असतं', असे देखील रिवाबाने म्हटलं.

जडेजाचा क्रिकेटमधील प्रवास पाहिलं तर त्याने अनेक वेळा अटीतटीच्या मॅचमध्ये निर्णायक ऑलराऊंड कामगिरी केली आहे. टीम इंडिया २०१३ मध्ये चॅम्पिअन ट्रॉफी जिंकली होती. त्यामॅचमध्ये जडेजा 'मॅन ऑफ द मॅच' ठरला होता.

दरम्यान रविंद्र जडेजाने सेमीफायनमधील पराभवानंतर ट्विट केले होते. जडेजाने ट्विट करत म्हटलं होतं की, कोणत्याही परिस्थितीत हार मानू नये. पराभूत झाल्यानंतरही ठामपणे उभं राहणे हे मी खेळामधून शिकलो आहे. मला क्रिकेटचाहत्यांनी प्रोत्साहन दिलं. मी त्यासाठी त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहे. तुम्ही अशाच प्रकारे पांठिबा देत रहा. मी अखेरपर्यंत चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असेल.'