19 वर्षीय भारतीय खेळाडूने ख्रिस गेलला असा चेंडू टाकली की, क्रिकेटचे नियम बनवणाऱ्यांना करावा लागला हस्तक्षेप

आयपीएल 2021 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्जच्या सामन्यांमध्ये रनांचा जोरदार पाऊस पडला. दोन्ही संघांनी 200 हून अधिक रन्स केले. 

Updated: Apr 13, 2021, 09:18 PM IST
19 वर्षीय भारतीय खेळाडूने ख्रिस गेलला असा चेंडू टाकली की, क्रिकेटचे नियम बनवणाऱ्यांना करावा लागला हस्तक्षेप title=

मुंबई : आयपीएल 2021 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्जच्या सामन्यांमध्ये रनांचा जोरदार पाऊस पडला. दोन्ही संघांनी 200 हून अधिक रन्स केले. अशा परिस्थितीत बॅालर्सना, बॅट्समॅनने आपल्या बॅटीने खूप चोप दिला. पहिल्या खेळामध्ये पंजाबने 221 धावा केल्या असताना राजस्थानचा संघ त्यांचा पाठलाग करताना 217 धावांवर पोहोचला. राजस्थानच्या रायन पराग हा एकमेव गोलंदाज होता ज्याने त्याच्या चेंडूंवर किमान धावा दिल्या. मात्र त्याने एकच ओव्हर टाकली आणि सात धावा दिल्या, तसेच एक विकेटही घेतली.

परंतु आकडेवारीच्या यादीमध्ये कमी इकनोमी असलेला गोलंदाज म्हणूनच परागचे नाव लिहले गेले. रायन परागच्या एकमेव ओव्हरमधील गोलंदाजी करुन त्याने लोकांचे लक्ष वेधले. यासह त्याच्या खेळावर बरेच प्रश्नही उद्भवले.

आसामकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणार्‍या परागने त्याच्या ओव्हरमध्ये ख्रिस गेल आणि केएल राहुलसमोर बॅालींग केली. राहुलसमोर त्याने नेहमी सारखी बॅालींग केली, पण गेलच्या समोर त्याने त्याचा खेळ बदलला. 19 वर्षीय रायन परागने स्लिंग अ‍ॅक्शनखाली (खांद्याच्या बरोबरच्या लेव्हलला बॅाल टाकत) गेलच्या समोर बॅालींग केली. त्याने खेळाच्या दहाव्या ओव्हरमधील पहिला बॅाल खालून फेकला. त्यांची ऍक्शन केदार जाधव सारखी होती. मग परागने खाली वाकून बॅाल फेकला.

नंतर पंचही त्याच्याशी बोलले. त्यांच्यामध्ये काय बोलणे झाले याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. परंतु बऱ्याच जणांनी अशा प्रकारे बॅाल फेकण्याबद्दल प्रश्न उपस्थित केले. त्याची अशी ऍक्शन पाहून कॅामेंन्टेटर देखील हसले.

काय आहे नियम

क्रिकेटच्या नियमांनुसार, बॉल टाकताना गोलंदाज आपला हात खांद्यापर्यंतच खाली आणू शकतो. रायन परागच्या बॅालींगवर आता मेरिलबोर्न क्रिकेट कौन्सिल (एमसीसी) चे विधान समोर आले आहे. क्रिकेटचे नियम हे एमसीसी तयार करतात. त्यांनी ट्वीट केले की, बॅाल खांद्यावर फेकला जावा अन्यथा नियम क्रमांक 21.1.2 अन्वये त्याला अंडरआर्म म्हटले जाऊ शकते.