Rohit Sharma on KL Rahul: टीम इंडियाने बॉर्डर-गावस्कर (Border–Gavaskar Trophy) ट्रॉफीचा दुसरा सामना जिंकून सिरीजमध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये 6 विकेट्सने पराभव केला. दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर रंगलेला दुसरा टेस्ट सामन्याचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला. नागपूर टेस्ट सामन्यामध्येही कांगारूंवर अशीच काहीशी परिस्थिती ओढावली होती. दरम्यान दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या डावामध्ये केएल राहुलचा (KL Rahul) फ्लॉप शो सुरुच होता.
दरम्यान याबाबत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) केएल राहुलबाबत मोठं विधान केलं आहे. रोहितने दिलेल्या या विधानावरून तो, केएल राहुलला अजून संधी देणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
टीम इंडियाचा ओपनर फलंदाज केएल राहुल सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर सिरीजच्या पहिल्या आणि दुसऱ्या टेस्टमध्ये त्याला चांगला खेळ करता आला नाही. एकाही डावामध्ये तो अर्धशतकी खेळी करू शकला नाही.
केएल राहुलबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, "आम्ही राहुलला पाठिंबा देत आहोत कारण त्याच्याकडे क्षमता आहे. तुम्हाला विविध पीचमधून रन्स करण्याचा मार्ग शोधण्याची गरज आहे. एक व्यक्ती काय करतो यावर जास्त लक्ष केंद्रित करणार नाही. आम्ही एक टीम म्हणून त्याकडे पाहतोय आणि हेच केएल राहुलबद्दल माझं मत आहे."
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात राहूलने (KL Rahul) पहिल्या डावात 17 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात टीम इंडियाला (Team India) 115 धावांचे लक्ष्य गाठायचे होते. हे लक्ष्य टीम इंडियाला आणखीनच सहज गाठला आले असते. मात्र राहूल टीम इंडियाला चांगली सुरूवात करून देऊ शकला नाही. आणि तो निव्वळ 1 धावा करून आऊट झाला. तर पहिल्या टेस्ट सामन्यात टीम इंडिया पहिलाच डाव खेळली. या डावात देखील त्याला 20 धावाच करता आल्या. त्यामुळे त्याच्या सततच्या अपयशी कामगिरीमुळे तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. तसेच त्याला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर करण्याची मागणी होतेय.
राहूलच्या (KL Rahul) सततच्या अपयशी कामगिरीवर राहूल द्रविड (Rahul Dravid) म्हणाला की, प्रत्येक खेळाडूच्या कारकीर्दीत अशी परिस्थिती येते. त्याने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अन्य देशात शतक झळकावली आहेत. मला विश्वास आहे की यातून बाहेर पडण्यासाठी त्याच्याकडे गुणवत्ता आहे.त्यामुळे आम्ही लोकेश राहूलच्या पाठिशी उभे आहोत. असे विधान करून द्रविड (Rahul Dravid) यांनी पुन्हा राहूलची पाठराखण केली आहे.