मुंबई : आयपीएलच्या १२व्या मोसमासाठीचा लिलाव मंगळवारी जयपूरमध्ये पार पडला. या लिलावामध्ये मुंबईच्या टीमनं युवराज सिंगला विकत घेतलं. मुंबईनं युवराज सिंगवर १ कोटी रुपयांची बोली लावली. बेस प्राईजवरच मुंबईनं युवराजला टीममध्ये घेतलं. मुंबईच्या टीममध्ये आल्यानंतर कर्णधार रोहित शर्मानं पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हिरोंच्या शहरात तुझं स्वागत, असं ट्विट रोहित शर्मानं केलं आहे.
Welcome to the city of heroics @YUVSTRONG12 https://t.co/EiPXBKtUKO
— Rohit Sharma (@ImRo45) December 19, 2018
मुंबईनं लिलावामध्ये लसिथ मलिंगाला २ कोटी आणि युवराज सिंगला १ कोटी रुपये देऊन विकत घेतलं. तर युवा खेळाडू बरिंदर श्रनला ३.४० कोटी, अनमोलप्रीत सिंगला ८० लाख रुपये आणि रसिक दार, पंकज जयस्वाल यांना प्रत्येकी २० लाख रुपये दिले.
मुंबईच्या टीममध्ये निवड झाल्यानंतर युवराजनं ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईच्या कुटुंबात जोडला गेल्याचा मला अभिमान वाटत असल्याचं युवराज म्हणाला.
Paltan, ab aayega mazaa #CricketMeriJaan @YUVSTRONG12 pic.twitter.com/7fSWYnUTRQ
— Mumbai Indians (@mipaltan) December 19, 2018
रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन, सूर्यकुमार यादव, मयांक मार्कंडे, राहुल चहर, अनुकूल रॉय, सिद्धेश लाड, आदित्य तरे, क्विंटन डी कॉक, कायरन पोलार्ड, बेन कटिंग, मिचेल मॅकलेनघन, ऍडम मिलन, जेसन बेहरेनड्रॉफ, युवराज सिंग, रसिख सलाम, पंकज जैसवाल, बरिंदर श्रन अनमोलप्रीत सिंग, लसिथ मलिंगा