Rohit Sharma : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ( ICC World Test Championship ) भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( India vs Australia ) यांच्यामध्ये सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या टीमने प्रथम फलंदाजी करत 469 रन्स केले होते. यानंतर टीम इंडियाचे ( Team India ) टॉप ऑर्डरचे फलंदाज फेल गेलेले दिसले. केवळ एक खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना पुरून उरला तो म्हणजे अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ). अजिंक्य रहाणे कांगारूंना एकटा भिडत होता तर त्याचवेळी ड्रेसिंग रूममधून रोहित शर्मा मात्र इतर सहकाऱ्यांसोबत बसत आणि मस्करी करताना कॅमेरात कैद झाला.
18 महिन्यांनी कमबॅक केल्यानंतर अजिंक्य रहाणेने ( Ajinkya Rahane ) टीम इंडियाकडून उत्तम खेळ केला. अवघ्या 11 रन्सने अजिंक्यचं ( Ajinkya Rahane ) शतक हुलकं. रहाणेने 129 बॉल्समध्ये 89 रन्सची खेळी केली. त्याच्या या खेळीमध्ये 11 फोर आणि एका सिक्सचा समावेश आहे. मात्र यावेळी रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल सामन्यामध्ये रोहित शर्माने ( Rohit sharma ) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे टीम इंडिया पहिल्याच दिवशी बॅकफूटवर गेली होती. टीम इंडियाकडून फलंदाजी करताना विराट, रोहित आणि पुजारा यांना चांगला खेळ करता आला नाही, तर मराठमोळा अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) एकटाच कांगारूंशी दोन हात करत होता.
एकीकडे अजिंक्य रहाणे टीम इंडियाला फॉलोऑनपासून वाचवण्याच्या प्रयत्नात होता, तर दुसरीकडे ड्रेसिंग रूममध्ये बसून कर्णधार रोहित शर्मा ( Rohit sharma ) मात्र इतर सहकाऱ्यांशी हसताना आणि मजा करताना दिसला. रोहितच्या या कृत्यावरून त्याच्यावर टीका करण्यात येतेय.
या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासोबत ( Rohit sharma ) ऑल राऊंडर रविंद्र जडेजा, गोलंदाज मोहम्मद सिराज दिसून येतायत. यामध्ये ते बसून कोणत्या एका गोष्टीची मजा घेतायत. याशिवाय या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विराट कोहलीवर देखील टीका करण्यात आली. विकेट गमावल्यानंतर विराट ड्रेसिंगरूममध्ये सहकाऱ्यांसोबत खात असताना स्पॉट झाला. या कारणाने त्याच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली.
Ye kya pic.twitter.com/rmEu7XkKuM
— Cricket (@Crictadium) June 9, 2023
तब्बल 18 महिन्यांच्या दीर्घ काळानंतर अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) टीममध्ये कमबॅक केलंय. या मराठमोळ्या खेळाडूने ऑस्ट्रेलियाविरूद्ध झुंजार खेळी केली. टॉप आर्डर फेल गेल्यानंतर रहाणेने ( Ajinkya Rahane ) एक बाजू लावून धरली. रहाणे शतक पूर्ण करणार, असं सर्वांना वाटत असताना मात्र रहाणेला 89 रन्सवर बाद केलं. 11 धावांनी रहाणेचं शतक हुकलं.