सुर्रर्रर्रर्रर्रsss के पिओ....; कडक उन्हाळ्यात कर्णधार Rohit Sharma घेतोय टपरीवरच्या चहाची मजा

अनेकांना वडापाव म्हटलं की, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आवडतो. मात्र यावेळी रोहित शर्मा वडापाव नव्हे तर मुंबईच्या टपरीवर चहा घेत असताना स्पॉट झाला.

Updated: Mar 12, 2023, 07:39 PM IST
सुर्रर्रर्रर्रर्रsss के पिओ....; कडक उन्हाळ्यात कर्णधार Rohit Sharma घेतोय टपरीवरच्या चहाची मजा title=

Rohit Sharma : चहाची चाहत कोणाला नसते आणि जर चहा टपरीवरचा असेल तर अनेकांना तो आवडतो. खासकरून मुंबईकरांना टपरीवरच्या चहाची आवड असते. मुंबईच्या टपरीवरचा चहा (Tea) आणि वडापाव (Vadapaav) यांचं कॉम्बिनेशन काही वेगळंच. अनेकांना वडापाव म्हटलं की, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आवडतो. मात्र यावेळी रोहित शर्मा वडापाव नव्हे तर मुंबईच्या टपरीवर चहा घेत असताना स्पॉट झाला.

मुंबई इंडियन्सच्या टीमचं स्पेशल फोटोशूट

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचं खास मुंबईच्या स्पेशल गोष्टींबाबत फोटोशूट करण्यात आलंय. यावेळी टीमचा कर्णधार रोहित शर्मा कडक उन्हाळ्याच्या दिवसात टपरीवरचा चहा घेताना दिसतोय. मुंबई इंडियन्सच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून रोहितचा हा फोटो ट्विट करण्यात आला आहे. या फोटोला कॅप्शन देताना म्हटलं की, मुंबईचा heart & soul ... and a कडक चहा too!

याशिवाय मुंबईच्या ट्विटर हँडलवरून अजून एक ट्विट करण्यात आलंय. या फोटोमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमचे खेळाडू पियुष चावला आणि अर्शद खान हे खेळाडू वडापाव खाताना दिसतायत. या फोटोला, मिर्ची, मिर्ची, मिर्ची असं कॅप्शन देण्यात आलं आहे. 

मुंबई इंडियन्सची नवी जर्सी

आयपीएलच्या नव्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने नवी जर्सी लॉन्च केली आहे. त्यामुळे रोहित शर्माची मुंबई इंडियन्स आता नव्या जर्सीमध्ये दिसणार आहे. नवी जर्सी जुन्या जर्सीशी बऱ्याच प्रमाणात मिळती जुळती आहे.

नव्या जर्सीबद्दल मुंबई इंडियन्सच्या प्रवक्ताने माहिती दिली आहे. नवी जर्सी ही मुंबई इंडियन्सची संस्कृती दर्शवते. आम्ही आमच्या समर्थकांच्या जोश आणि पाठिंब्याच्या बळावर मैदानात पाऊल ठेवायला सज्ज आहोत, कारण आम्ही ही जर्सी परिधान करतो, असं त्यांनी म्हटलं आहे. याशिवाय पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सची जर्सी चाहत्यांनाही खरेदी करता येणार आहे. आपलं नाव आणि आवडत्या नंबरसह चाहते ही जर्सी खरेदी करु शकतात. प्रत्येक वयोगटातील फॅन्ससाठी जर्सी विविध साईज उपलब्ध असणार आहे

मुंबईचा पहिला सामना 2 एप्रिलला

येत्या 31 मार्चपासून आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. 28 मेपर्यंत आयपीएलचा थरार रंगणार आहे. आयपीएलचा पहिला सामना (IPL 2023, 1st Match) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 31 मार्च रोजी गुजरात टायटन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स (Gujarat Titans vs Chennai Super Kings) यांच्यात खेळवला जाईल. तर मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पहिला सामना 2 एप्रिलला होणार आहे.