BAN vs IND : 4 डिसेंबरपासून बांगलादेश आणि भारत (BAN vs IND) यांच्यामध्ये 3 वनडे सामन्यांची सिरीज आणि दोन टेस्ट सामन्यांची सिरीज खेळवली जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण टीम बांगलादेश दौऱ्यावर पोहोचली आहे. न्यूझीलंडच्या दौऱ्यावर रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) सह अनेक वरीष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आला होता. मात्र आता बांगलादेशाच्या दौऱ्यावर या खेळाडूंचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. बांगलादेशमध्ये टीम इंडियाचे खेळाडू पोहोचल्याचा व्हिडीओ बीसीसीआयने (BCCI) सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट केलाय.
या पोस्टमध्ये भारत ते बांगलादेश असा खेळाडूंचा प्रवास दाखवण्यात आलाय. दरम्यान यावेळी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या मजामस्तीवर अनेकांनी टीका केलीये.
नुकतंच टीम इंडियाला वर्ल्डकपमध्ये दारूण पराभवाला सामोरं जावं लागलंय. सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. असं असूनही बांगलादेशच्या दौऱ्यावर जाताना टीम इंडियाचे खेळाडू मजामस्ती करत होते. यामध्ये कर्णधार रोहित शर्माही अपवाद ठरला नाही. विमानात बसून कॅमेरासमोर रोहित शर्माने जीभ काढून दाखवलीये. त्यामुळे चाहते वैतागले असून, खेळाडूंना वर्ल्डकप हरल्याचं काहीही दुःख नसल्याचं बोललं जातंय.
न्यूझीलंडच्या दौऱ्यानंतर टीम इंडिया बांगलादेशाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 4 दिसंबर रोजी होणार आहे. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला सिरीज खेळायची आहे.
वनडे टीम: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, सुंदर, शार्दुल ठाकुर , मो. शमी, मो. सिराज, दीपक चाहर, यश दयाल
टेस्ट टीम: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव