मुंबईच्या रस्त्यावर फिरतीये रोहित शर्माची Lamborghini, हिटमॅनच्या नंबर प्लेटची तुफान चर्चा!

Rohit Sharma's Lamborghini Number Plate: टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याच्या लॅम्बोर्गिनी गाडीच्या युनिक नंबर प्लेटची तुफान चर्चा होताना दिसतीये. त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झालाय.

सौरभ तळेकर | Updated: Aug 16, 2024, 07:15 PM IST
मुंबईच्या रस्त्यावर फिरतीये रोहित शर्माची Lamborghini, हिटमॅनच्या नंबर प्लेटची तुफान चर्चा! title=
Rohit Sharma's Lamborghini Number Plate

Rohit Sharma Lamborghini In Mumbai : श्रीलंका दौरा संपल्यानंतर टीम इंडियाला मोठा ब्रेक मिळाला आहे. भारतीय संघाला तब्बल 5 आठवड्यांची सुट्टी मिळालीये. त्यानंतर टीम इंडिया 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध दोन हात करणार आहे. त्यापूर्वी खेळाडू कुटूंबासोबत वेळ घालवत असल्याचं दिसतंय. टीम इंडियाचा किंग विराट कोहली लंडनमध्ये फिरतोय. तर हिटमॅन रोहित शर्मा मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय. अशातच रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हारयल झालाय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान शेअर केला जातोय.

रोहित शर्मा नुकताच मुंबईत त्याच्या निळ्या रंगाच्या लॅम्बोर्गिनी उरूसमध्ये (Lamborghini Urus) दिसला. मुंबईतील एका भागात तो गाडी चालवताना दिसला. मात्र, चर्चा सुरू आहे ती, रोहित शर्माच्या लॅम्बोर्गिनीच्या नंबर प्लेटची... टीम इंडियाचा प्रॅक्टिस टी-शर्ट घालून रोहित शर्मा गाडी चालवत होता. परंतू रोहितच्या गाडीची नंबर प्लेट रोहितच्या क्रिकेट करियरशी संबंधित होती. होय, लॅम्बोर्गिनीचा नंबर होता.. 0264

रोहित शर्माच्या लॅम्बोर्गिनीचा नंबर 0264 का होता? याची लिंक तुम्हालाही लागली असेल. तुमच्या माहितीसाठी रोहित शर्माची वनडे करियरमधील सर्वोत्तम धावसंख्या 264 होती. श्रीलंकेविरुद्ध रोहित शर्माने वादळी खेळी करत द्विशतक ठोकलं होतं. यावरून रोहित शर्माच्या गाडीची नंबर प्लेट तयार करून घेतली आहे. 

दरम्यान, रोहित शर्मा मुंबईत राहत असून त्याचं हे घर आलीशान आहे. सध्या रोहित शर्मा राहत असलेल्या घराची किंमत तब्बल 30 लाख रूपये आहे. याशिवाय रोहितने हैदराबादमध्ये एका बंगला खरेदी केला आहे, ज्याची किंमत जवळपास 5 कोटी रूपये असल्याची माहिती आहे. एकंदरीत माहिती घेतली तर रोहित शर्माचं नेट वर्थ 214 कोटी आहे. रोहित शर्माची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. केवळ देशातच नाही तर जगभरात रोहित शर्माचे चाहते आहे. इंस्टाग्रामवर रोहित शर्माचे 37.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. सध्या तो जवळपास 28 ब्रँडशी जोडला गेलेला आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x